Yaas cyclone update: यास चक्रीवादळ: 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, उद्या धडकणार; बंगालमध्ये अनेक घरे उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 11:09 PM2021-05-25T23:09:31+5:302021-05-25T23:15:29+5:30

Cyclone Yaas will hit tomorrow: चक्रीवादळाची भीषणता पाहता उद्या सकाळी 8.30 वाजल्य़ापासून रात्री 7.45 वाजेपर्र्यंत कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आला आहे. तसेच मदत कार्यासाठी नौदल आणि हवाई दलाची विमाने तयार ठेवण्यात आली असून जवळपास 90 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. 

Yaas cyclone update: 1 million people evacuated, hit tomorrow; Many houses were demolished in Bengal | Yaas cyclone update: यास चक्रीवादळ: 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, उद्या धडकणार; बंगालमध्ये अनेक घरे उद्ध्वस्त

Yaas cyclone update: यास चक्रीवादळ: 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, उद्या धडकणार; बंगालमध्ये अनेक घरे उद्ध्वस्त

Next

Cyclone Yaas : तौक्ते चक्रीवादळ शमत नाही तोच बंगालच्या उपसागरावर यास चक्रीवादळाने (Cyclone Yaas) रौद्र रुप धारण केले असून भारतावर धडकण्याआधीच विध्वंस सुरु केला आहे. पश्चिम बंगालच्या नईहाटी आणि हालीशहरमध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून बुधवारी वादळ आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. (Cyclone Yaas has intensified into 'very severe cyclonic storm': IMD DG M Mohapatra. )


चक्रीवादळाची भीषणता पाहता उद्या सकाळी 8.30 वाजल्य़ापासून रात्री 7.45 वाजेपर्र्यंत कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आला आहे. तसेच मदत कार्यासाठी नौदल आणि हवाई दलाची विमाने तयार ठेवण्यात आली असून जवळपास 90 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. 


बंगाल आणि ओडिशामधील जवळपास 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पश्चिम बंगाल, आसाम, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालमध्ये वेगवान वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विजेचे खांब उखडून पडले आहेत. स्थानिक पोलीस नईहाटी आणि हालीशहरमध्ये पोहोचले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. यास चक्रीवादळ उद्या दुपारी बंगाल आणि ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. 

Weather Alert : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अति तीव्र 'यास' चक्रीवादळ बुधवारी सकाळी धडकणार


यासने एक भीषण चक्रीवादळ बनले असून रात्री हवेचा वेग वाढण्याची शक्यता आहे. उद्या हवेचा वेग ताशी 160-185 किमीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. पाच राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशमध्ये एनडीआरएफची 115 टीम तैनात आहेत. 

Web Title: Yaas cyclone update: 1 million people evacuated, hit tomorrow; Many houses were demolished in Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.