चिंताजनक! देशभरात एका दिवसात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 06:33 AM2020-05-31T06:33:22+5:302020-05-31T06:33:32+5:30

अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर भारताचा क्रमांक

Worrying! Most new patients were found in a single day across the country | चिंताजनक! देशभरात एका दिवसात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले

चिंताजनक! देशभरात एका दिवसात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर आता भारतात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. मागील संपूर्ण आठवड्यात देशातील रुग्णांची रोजची संख्या सरासरी ६ हजार ९५२ ने वाढली आहे. मागील २४ तासांत रुग्ण ७,९६४ ने वाढले. ही आतापर्यंतची एका दिवसात झालेली सर्वाधिक वाढ आहे.


भारतात २३ मे रोजी १,२५,१०१ रुग्ण होते. त्यानंतर एका आठवड्यात म्हणजे ३० मे रोजी ते १,७३,७६३ इतके झाले. म्हणजेच सात दिवसांत देशात ४८,६६२ नवे रुग्ण आढळले.
अमेरिकेत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे तर ब्राझील आणि भारतात रुग्णसंख्येत होणारी वाढ कायम आहे. रशियात वेगाने होणारी वाढ आजही कायम आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात अमेरिकेत रोज २१,४३९ या सरासरीने १,५०,०७२ इतके नवे रुग्ण वाढले तर ब्राझीलमध्ये १७,१७७ च्या सरासरीने १,२०,२४२ नवे रुग्ण आढळले. रशियामध्ये ८,७३९ च्या सरासरीने ६१,१७५ नवे रुग्ण आढळले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Worrying! Most new patients were found in a single day across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.