गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 04:04 PM2020-06-22T16:04:46+5:302020-06-22T16:54:40+5:30

देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

word exchange between Congress & BJP on Galwan issue, Now Mayawati statement on this issue | गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान...

गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान...

Next
ठळक मुद्देया संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाने संपूर्ण परिपक्वता आणि एकजुटीने काम केले पाहिजेअशा कठीण आणि आव्हानात्मक प्रसंगी भारत सरकारच्या पुढील कारवाईबाबत लोकांच्या आणि तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे असू शकतातमात्र अशा प्रसंगी देशहीत आणि सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सरकारवर सोडणेच योग्य ठरेल

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्य दलांमध्ये निर्माण झालेला तणाव सध्या जैसे थे आहे. मात्र सीमेवरील तणावामुळे दिल्लीतील राजकीय वातावरणही सध्या तापलेले आहे. लडाखमधील चिनी घुसखोरीवरून आरोपांच्या फैरी झाडून काँग्रेसने सत्ताधारी मोदी सरकारला जेरीस आणले आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

गलवान विवादावर ट्विटरव दिलेल्या प्रतिक्रियेत मायावती म्हणाल्या की, ‘’हल्लीच १५ जून रोजी लडाखमध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत भारताच्या कर्नलसह एकूण २० जवानांना वीरमरण आले आहे, या घटनेमुळे संपूर्ण देश खूप दु:खी आणि चिंतीत आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाने संपूर्ण परिपक्वता आणि एकजुटीने काम केले पाहिजे, हे काम संपूर्ण जगाला दिसले पाहिजे आणि प्रभावी असले पाहिजे,’’

अशा कठीण आणि आव्हानात्मक प्रसंगी भारत सरकारच्या पुढील कारवाईबाबत लोकांच्या आणि तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे असू शकतात. मात्र अशा प्रसंगी देशहीत आणि सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सरकारवर सोडणेच योग्य ठरेल. तसेच हे काम ही सरकारची जबाबदारीच आहे, असा मायावती यांनी सांगितले.  

एकीकडे गलवानवरून कांग्रेस केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत असताना मायावती यांनी अशा आशयाचे विधान केल्याने हे विधान चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान, आज सकाळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून सरकारवर टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधींसह संपूर्ण काँग्रेस पक्ष सरकारविरोधात आक्रमक झाला आहे.  

दरम्यान, मनमोहन सिंग यांनी केलेल्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तरही देण्यात आले आहे. नड्डा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनमोहनसिंग यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. त्यात ते म्हणतात की, निश्चितच ते काही विषयांसंदर्भात आम्हाला सल्ला व सूचना देऊ शकतात. मात्र, पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी त्यापैकी एक नाही. शिवाय ते त्याच पक्षाचे नेते आहेत, ज्या पक्षाने हजारो किमी जमीन चीनला देऊ केल्याचे म्हटले. नड्डा यांनी मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. डॉक्टर मनमोहनसिग हे त्याच पक्षाचे आहेत, ज्या पक्षाने 43000 किमी जमी चीनला दिली आहे. कुठल्याही लढाईशिवाय रणनिती आणि क्षेत्रीय समर्पण युपीए सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. डॉ. सिंग हे चीनी डिझाईनमुळे चिंतेत आहेत. सन 2010 ते 2013 या कालावधीत चीनकडून 600 पेक्षा अधिकवेळी सीमाभागात घुसखोरी करण्यात आली, त्यावेळी सिंग हेच अध्यक्ष होते, असेही नड्डा यांनी म्हटलंय.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

Web Title: word exchange between Congress & BJP on Galwan issue, Now Mayawati statement on this issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.