जगात स्त्रियांचा प्रभाव......जोड
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30
या वेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा़डॉ़प्रदिप देशमुख यांनीही आपले यथोचित विचार मांडले़

जगात स्त्रियांचा प्रभाव......जोड
य वेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा़डॉ़प्रदिप देशमुख यांनीही आपले यथोचित विचार मांडले़ या चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू डॉ़जे़एम़वाघमारे म्हणाले की, कोणताही बदल अगोदर मनात जन्म घेतो व नंतर बाहेर येतो़ विचार, आचार, आहार, वेषभूषा, राहणीमांन यात काळाबरोबर बदल होत असल्याचे आपण पाहतो़ पूर्वी सहावारी साडी, नऊवारी साडी आता साडी मागे पडत आहे़ राहणीमानांबरोबर जीवनातही बदल होत आहेत़ स्वातंत्र्य, समता, न्याय ही जीवनमूल्येही तितकीच महत्वाची आहेत़ पूर्वी स्त्रीला स्वातंत्र्य नव्हते़ ती पुरुषसत्ताक व्यवस्थेत गुलाम मानली जात होती़ बदलत्या जगाबरोबर जीवनही बदलले़ प्रत्येक धर्म, पंथ, संस्था यांचे नियम परस्परापेक्षा वेगळे आहेत असेही दिसून येते़ विवाह हा स्वर्गात होतो म्हणून तो मोडता येत नाही, असे मानले गेले़ प्रत्येक धर्माने विवाहाचे नियम ठरवले असल्याचेही असे त्यांनी सांगितले़ याप्रसंगी प्राचार्य अजय पाटील, प्राचार्य डॉ़राम वाघ, उपकेंद्र संचालक डॉ़ देवेंद्र मिश्रा, प्राचार्य प्रमेला वैजापूरे, प्ऱप्राचार्य जी़आऱपवार, साधन व्यक्ती डॉ़पुष्पेस कुमार, प्रा़डॉ़संजय कांबळे, प्रा़पुनम नथानी, प्रा़सुरेश वाघमारे आदींची उपस्थिती होती़ सुत्रसंचलन प्रा़डॉ़बालाजी भोसले, प्रा़सौ़डॉ़आशा मुंडे यांनी केले तर आभार प्रा़सौ़डॉ़उल्का देशमुख यांनी केले़