हृदयद्रावक! लाईट ऑन करताच ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा भीषण स्फोट; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 04:22 PM2021-07-18T16:22:53+5:302021-07-18T16:23:38+5:30

Oxygen Concentrator Explodes : महिलेने लाईटचा स्विच ऑन केला असता ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरमध्ये भीषण आग लागली आणि त्यातील ऑक्सिजनमुळे संपूर्ण घर हे आगीच्या विळख्यात सापडलं.

woman killed husband critical after oxygen concentrator explodes in rajasthan gangapur | हृदयद्रावक! लाईट ऑन करताच ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा भीषण स्फोट; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

हृदयद्रावक! लाईट ऑन करताच ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा भीषण स्फोट; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

Next

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. गंगापूरमध्ये एका घरात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा (oxygen concentrator) भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने लाईटचा स्विच ऑन केला असता ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरमध्ये भीषण आग लागली आणि त्यातील ऑक्सिजनमुळे संपूर्ण घर हे आगीच्या विळख्यात सापडलं. यामध्येच महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

आयएएस अधिकारी हर सहाय मीणा यांचा भाऊ सुल्तान सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात आली होती. सुल्तान सिंह यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांची पत्नी संतोष मीणा त्यांची देखभाल करत होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. संतोष मीणा यांनी नेहमीप्रमाण शनिवारी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर ऑन केला आणि त्याचा स्फोट झाला. मशिनमधून ऑक्सिजन गळती होत असल्याने ही दुर्घटना झाल्याचं म्हटलं जात आहे.

संतोष मीणा या गर्ल्स कॉलेजमध्ये मुख्याध्यापिका होत्या. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या स्फोटानंतर संपूर्ण घरात आग पसरली. दोघांचा आवाज ऐकल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी धाव घेत दोघांना बाहेर काढलं. मात्र या आगीत दोघंही होरपळून निघाले होते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच संतोष मीणा यांचा मृत्यू झाला. तर सुल्तान सिंह या आगीत गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना जयपूरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दामत्याची दोन्ही मुलं दुर्घटनेवेळी बाहेर असल्याने सुखरुप आहेत. एका मुलाचं वय 10 वर्ष आणि दुसऱ्याचं वय 12 वर्ष आहे. 

बापरे! कोरोनामुळे 50 टक्के रुग्णांना आरोग्यविषयक समस्या; किडनी-लिव्हरवर गंभीर परिणाम, रिपोर्टमधून मोठा खुलासा

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा पुरवठा करणाऱ्या दुकानदाराची चौकशी करत आहेत. अजूनही स्फोटाचं कारण अस्पष्ट आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे 50 टक्के रुग्णांना हेल्थ कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच आरोग्यविषयक समस्या जाणवत आहेत. भयंकर बाब म्हणजे किडनी आणि लिव्हरवर गंभीर परिणाम होत आहे,. लँसेटच्या रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. लँसेटच्या रिपोर्टने चिंतेत भर टाकली आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासात जवळपास 50 टक्के रुग्णांमध्ये काहीनाकाही आरोग्य विषयक समस्या आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. लँसेटच्यावतीने यूकेमध्ये 73197 लोकांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या 49.7 टक्के रुग्णांमध्ये काहीना काही आरोग्यविषयक समस्या या होत्या. तसेच बरं झाल्यावर देखील अशीच परिस्थिती होती.

Web Title: woman killed husband critical after oxygen concentrator explodes in rajasthan gangapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.