wife left home because husband didnt brought egg for her | खरंच की काय? पतीनं अंडं खाऊ घातलं नाही म्हणून पत्नीनं सोडलं घर
खरंच की काय? पतीनं अंडं खाऊ घातलं नाही म्हणून पत्नीनं सोडलं घर

ठळक मुद्देपत्नीला खाण्यासाठी अंडं न देणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. पती घरामध्ये खाण्यासाठी अंडी देत नाही म्हणून पत्नी घर सोडून प्रियकरासोबत पळाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. 

गोरखपूर - पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याच्या घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक विचित्र घटना ही उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्हात घडली आहे. पत्नीला खाण्यासाठी अंडं न देणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. पती घरामध्ये खाण्यासाठी अंडी देत नाही म्हणून पत्नी घर सोडून प्रियकरासोबत पळाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कँपियरगंजमध्ये हे दांपत्य राहतं. चार महिन्याआधीही ही महिला पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र काही दिवसांनी ती घरी परत आली होती. पती खाण्यासाठी रोज अंडं देत नसल्याने दु:खी असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पुन्हा पती-पत्नीमध्ये अंड्यावरून वाद झाला. या वादानंतर संतापलेली पत्नी पुन्हा एकदा घरातून पळून गेली आहे. महिलेचा प्रियकरही त्या दिवसापासून आपल्या घरी नसल्याने ती प्रियकरासोबत पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

महिलेचा पती हा मजूर म्हणून काम करतो. त्यामुळेच रोज घरी खाण्यासाठी अंडी आणायला त्याच्याकडे पैसे नसतात. याचाच फायदा घेऊन पत्नीचा प्रियकर रोज घरी येतो. तसेच पत्नीला अंडं खायला आवडत असल्याने तो तिच्यासाठी नेहमीच अंडी घेऊन येत असल्याचा आरोप पतीने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं होतं. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र फक्त साडी घेऊन पती पोहचल्याने तिचा पारा चांगलाच चढला. गिफ्ट न आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली होती. 

गाझियाबादमध्ये दाम्पत्य राहतं. करवा चौथच्या निमित्ताने पत्नीने पतीला गिफ्ट म्हणून सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र पती फक्त नवीन साडी घेऊनच घरी आला. यामुळे पत्नी नाराज झाली आणि त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. पुढे हा वाद टोकाला गेला. संतापलेल्या पत्नीने पतीला काठीने मारायला सुरुवात केली. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीने त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दाम्पत्याची समजूत काढण्यात आली. तसेच आनंदात राहण्याचा सल्ला देऊन घरी परत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. पती-पत्नीत काही कारणांमुळे वाद झाला. मात्र हा वाद मिटल्याचं भासवून पतीने पत्नीकडे फ्रेंच किस मागितला. पण फ्रेंच किस न करता पतीने पत्नीची जीभ कापली. 
 

Web Title: wife left home because husband didnt brought egg for her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.