...म्हणून मोबाईल सिमकार्डचा एक कोपरा असतो कापलेला; जाणून घ्या, नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 11:50 AM2021-07-28T11:50:25+5:302021-07-28T11:54:33+5:30

SIM Card : मोबाईलमध्ये सिमकार्ड (SIM Card) हे अत्यंत महत्त्वाचं असतं.

why sim card have cut shape and mobile sim card have special design | ...म्हणून मोबाईल सिमकार्डचा एक कोपरा असतो कापलेला; जाणून घ्या, नेमकं कारण

...म्हणून मोबाईल सिमकार्डचा एक कोपरा असतो कापलेला; जाणून घ्या, नेमकं कारण

googlenewsNext

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा आता प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण त्याचा वापर करतात. मोबाईलमध्ये सिमकार्ड (SIM Card) हे अत्यंत महत्त्वाचं असतं. सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्युल (Subscriber Identity Module) SIM चा फुलफॉर्म असा आहे. सिमकार्ड हे एक इंटिग्रेटेड सर्किट (Integrated Circuit) असतं आणि ते ऑपरेटिंग सिस्टीम चालवतं. या कार्डमध्ये इंटरनॅशनल मोबाईल सबस्क्रायबर आयडेंटिटी (IMSI) सुरक्षितपणे साठवलेली असते. सिमकार्ड खरेदी केल्यानंतर प्रत्येक सबस्क्रायबरला एक युनिक क्रमांक (Unique Number) मिळतो. 

IMSI आणि युनिक क्रमांकामुळे डिव्हाइसवरच्या युजरची ओळख पटते. सिमकार्ड जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर त्याचा एक कोपरा कापलेला म्हणजेच कट असलेला दिसतो. 15 मिमी लांब, 25 मिमी रुंद आणि 0.76 मिमी जाडी अशा पद्धतीने हे सिमकार्ड डिझाईन केलेलं दिसतं. त्याचा एक कोपरा कापलेला दिसतो. सर्व सिमकार्ड याच आकाराची असतात. सिमकार्डचे अन्य कोपरे व्यवस्थित असताना एक कोपरा कापलेला असण्यामागचं नेमकं कारण काय? हा प्रश्न कधीतरी तुम्हाला नक्कीच पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. 

सिमकार्डचा एक कोपरा कापलेला का असतो, हे समजून घेण्यासाठी सिमकार्ड ट्रेच्या रचनेविषयी माहिती करून घेणं आवश्यक आहे. प्रत्येक मोबाईलमध्ये एक सिमकार्ड ट्रे असतो. हा ट्रे मोबाईलबाहेर काढता येतो. सिमकार्ड आणि हा ट्रे या दोघांचे डिझाईन एकमेकांना पूरक असतं. सिमकार्ड सेट करताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून या ट्रेचा एक कोपरा कापलेला असतो. या ट्रेचा थेट संबंध सिमकार्डचा काँटॅक्ट आणि मोबाईल कार्डहोल्डर पिनशी असतो. सिमकार्डच्या पिन क्रमांक 1 चा मोबाईलच्या पिन क्रमांकाशी मेळ बसावा याकरिता ट्रेमध्ये सिमकार्डच्या योग्य प्लेसमेंटसाठी एक कटमार्क (Cut mark) केला जातो. सिमकार्ड या कटमार्कमध्ये योग्य पद्धतीने बसलं नाही तर फोन लागण्यास अडचणी निर्माण होतात. या ट्रेमध्ये सिम उलटं घातलं गेलं, तर आपल्याला 'सिम डिसेबल' असा मेसेज दाखवला जातो.

मोबाईलमध्ये सिम टाकताना ते कुठे आणि कोणत्या बाजूने घालायचं, हे समजण्यासाठीही सिमकार्डचा एक कोपरा कापलेला असतो. चुकीच्या पद्धतीने सिमकार्ड फोनमध्ये घातलं जाऊ नये, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. सिमकार्ड योग्य स्थितीत फोनमध्ये राहावे, हे देखील त्याचा एक कोपरा कापण्यामागचं एक कारण असतं. मोबाईलमध्ये असलेल्या मायक्रोचिपचा आकारदेखील सिमकार्डप्रमाणेच असतो. त्यावरदेखील एक कट मार्क असतो. या चिपवरच्या प्रत्येक कटमार्कला जीएनडी, व्हिपीपी, आय/ओ, ऑप्शनल पॅड, रिसेट आणि व्हिसीसी अशी नावं ठरलेली असतात आणि त्यांची कामंही ठरलेली असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: why sim card have cut shape and mobile sim card have special design

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.