'दिल्लीवरून आलेल्या NCB पथकाच्या कारवर 'कमळ' चिन्ह कशासाठी?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 08:57 PM2020-09-08T20:57:27+5:302020-09-08T20:58:56+5:30

एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. तर, दिल्लीतील नार्कोटीक्स ब्युरो पथकाकडूनही रिया प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Why the 'lotus' sign on the car of the NCB squad from Delhi? nitin raut questioned | 'दिल्लीवरून आलेल्या NCB पथकाच्या कारवर 'कमळ' चिन्ह कशासाठी?'

'दिल्लीवरून आलेल्या NCB पथकाच्या कारवर 'कमळ' चिन्ह कशासाठी?'

googlenewsNext
ठळक मुद्देड्रग्ज प्रकरणात रिया व तिच्याशी संबंधित व्यक्तींचा तपास या पथकाडून होत आहे. मात्र, या पथकांच्या गाडी वापरावरुन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबई - सुशांत राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला आज अटक करण्यात आली आहे. तिच्या अटकेनंतर रियाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येईल. एनसीबी कार्यालयात सध्या रियाची तिसर्‍या दिवशी चौकशी केली जात आहे. रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. एनसीबीने एनडीपीएस ऍक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी केंद्र सरकारच्या तपासावर काँग्रेस नेत्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत.

एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. तर, दिल्लीतील नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो पथकाकडून रिया प्रकरणाचा तपास सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात रिया व तिच्याशी संबंधित व्यक्तींचा तपास या पथकाडून होत आहे. मात्र, या पथकांच्या गाडी वापरावरुन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सुशांत प्रकरणात रियाच्या चौकशीसाठी नार्कोटीक्स पथक दिल्लीतून मुंबईत आले आहे. मात्र, मुंबईत आल्यानंतर या पथकाने जी गाडी वापरली आहे, त्या गाडीच्या नंबर प्लेटवर कमळाचे चिन्हा कशासाठी? असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गाडीचा फोटो शेअर करत हा प्रश्न विचारला आहे. या गाडीचा नंबर  MH 46 AP 6566 असा आहे. 

 

सुशांतप्रकरणात राज्यातील आणि बिहारमधील भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे, याप्रकरणी भाजपा नेत्यांचा दवाब टाकण्यात येत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यातच, राऊत यांनी गाडीचा फोटो शेअर करत, प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

दिल्लीचे पथक चौकशीसाठी मुंबईत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी आता NCB नं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावून चौकशीला बोलावलं होतं. या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यावेळी ती अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली. आज रियाच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने कडक कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात शोविक आधीपासूनच एनसीबीच्या ताब्यात आहे. त्याचवेळी एनसीबीची रियाची चौकशी सुरूच आहे. सोमवारी रियाने वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांत सिंगची बहीण प्रियंकाविरूद्ध तक्रार दाखल केली. रियासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे. एनसीबीच्या तिसर्‍या दिवशीही रिया चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे. तिने ड्रग्स घेतल्याची माहिती आज पहिल्यांदाच अडखळत सांगितली. यापूर्वी रिया ठाम होती की तिने कधीही ड्रग्ज घेतले नाही. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात एनसीबी २५ बॉलिवूडसेलिब्रिटींना बोलावणार आहे. रियाने बॉलिवूड पार्ट्यांची नावेही दिली आहेत जिथे ड्रग्स वापरली जात असे. एनसीबी सुशांतचे सह-कलाकार आणि कलाकार यांना देखील समन्स पाठवणार आहे.

 सुशांतला चार वर्षापासून ड्रगचे व्यसन

सुशांत सिंग राजपूतला 2016 पासून अमली पदार्थाचे व्यसन होते, तेव्हा आम्ही एकमेकाच्या संपर्कातही नव्हतो, असा जबाब रिया चक्रवर्तीने अधिकाऱ्यांना दिला असल्याचे समजते. एनसीबीच्या तीन दिवसाच्या चौकशीमध्ये रियाने ड्रगच्या कनेक्शनबाबत अनेक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यामध्ये सुशांतला पूर्वीपासून ड्रगचे व्यसन होते, स्टाफच्या माध्यमातून तो त्याची मागणी करीत असे, आपल्या संबंधात आल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार ती शोविक व अन्य स्टाफच्या माध्यमातून गांजा मागवित होते.
 

Web Title: Why the 'lotus' sign on the car of the NCB squad from Delhi? nitin raut questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.