Narendra Modi: पेट्रोल, डिझेल का महागले? जगभरातील कंपन्यांसोबत नरेंद्र मोदींची हायलेव्हल मिटिंग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 07:25 PM2021-10-20T19:25:37+5:302021-10-20T19:32:16+5:30

PM meeting with CEO of global oil companies: लोकांमध्ये कमालीचा रोष असून हा असंतोष कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील प्रमुख तेल कंपन्यांसोबत हायलेव्हल मिटिंग बोलविली आहे.

Why are petrol and diesel expensive? Narendra Modi's high level meeting with CEO of global oil companies | Narendra Modi: पेट्रोल, डिझेल का महागले? जगभरातील कंपन्यांसोबत नरेंद्र मोदींची हायलेव्हल मिटिंग सुरु

Narendra Modi: पेट्रोल, डिझेल का महागले? जगभरातील कंपन्यांसोबत नरेंद्र मोदींची हायलेव्हल मिटिंग सुरु

Next

देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी कहर मांडला आहे. आधीच कोरोनामुळे थंड पडलेल्या उत्पन्नावर खिशाला ठिगळे पाडण्याचे काम इंधन दरवाढीने केले आहे. यामुळे लोकांमध्ये कमालीचा रोष असून हा असंतोष कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील प्रमुख तेल कंपन्यांसोबत हायलेव्हल मिटिंग बोलविली आहे. ही बैठक सुरु झाली आहे. इंधनाच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचे समजते. (PM meeting with CEO of global oil companies) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या या बैठकीत प्रत्येक कंपनीच्या सीईओला तीन मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. यानंतर मोदी आपले विचार मांडणार आहेत. ही माहिती पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर यांनी दिली आहे.

या बैठकीमध्ये रशियाची कंपनी रोजनेफ्टचे अध्यक्ष डॉ. आइगोर सेचिन, सौदी अरामकोचे सीईओ अमीन नासिर, ब्रिटिश पेट्रोलियमचे बर्नार्ड लूनी, अमेरिकेच्या श्लमबर्जर लिमिटेडचे ओलिवर ली पेच, हनीवेलचे अध्यक्ष ब्रायन ग्लोवर, रिलायन्सचे मुकेश अंबानी, वेदांता लिमिटेडचे अध्यक्ष नितीन अग्रवाल हे उपस्थित आहेत. 

कपूर यांनी म्हटले की, कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. आता पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी अंत गाठला आहे. यावर तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांनी प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा आहे. तेलाच्या किंमती अचानक खाली जाव्यात अशी मागणी नाही. कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी एवढी जास्त किंमत योग्य नाही, हे समजून घ्यायला हवे. आजच्या बैठकीत किंमती कितीपर्यंत वाढाव्यात यावर एक लिमिट टाकण्यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. 

संबंधीत बातमी...

Petrol, Diesel Price Cut: दिवाळीआधी पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी घट होणार? मोदी सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

Web Title: Why are petrol and diesel expensive? Narendra Modi's high level meeting with CEO of global oil companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.