What is at June 28 and 1 July in parliament? BJP has issued three line whip to its Mps | संसदेत 28 जून आणि 1 जुलै काय? भाजपाकडून दोन्ही सभागृहाच्या खासदारांना व्हीप जारी
संसदेत 28 जून आणि 1 जुलै काय? भाजपाकडून दोन्ही सभागृहाच्या खासदारांना व्हीप जारी

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त करताना काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना त्यांच्याच शब्दांच उत्तर दिले. या काळात तिहेरी तलाकचे विधेयक लोकसभेत पुन्हा संमत करण्यात आले. मात्र, भाजपानेलोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला असून 1 जुलैला कोणत्याही परिस्थितीत संसदेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मला सुरूवात झाली आहे. राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसले तरीही लोकसभेत मोदींना स्पष्ट बहुमत आहे. यामुळे या जोरावर महत्वाचे निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. मोदींना गेल्या तीस वर्षांतील सर्वात जास्त बहुमत मिळाले आहे. 5 जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने खासदारांना व्हीप जारी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपाने तीन ओळींचा व्हीप जारी केला असून लोकसभेच्या खासदारांना 28 जून आणि 1 जुलैला सभागृहात कोणत्याही परिस्थितीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर राज्यसभेच्या सदस्यांना 1 जुलैला सभागृहात हजर राहण्यास सांगितले आहे. या काळात मोदी जी 20 देशांच्या शिखर परिषदेला हजर राहण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर असणार आहेत. यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत संसदेत कोणते निर्णय होतील, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. 
तत्पूर्वी मोदी यांनी राज्यसभेमध्ये आज काँग्रेसच्या टीकेला जोरदार प्रत्यूत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील चमखी बुखार या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, बिहारमधील रुग्णालयात लहान मुलांचा झालेला मृत्यू हा आपल्यासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून आरोग्यमंत्रीही पाठपुरावा करत असल्याचे मोदींनी म्हटले. 


Web Title: What is at June 28 and 1 July in parliament? BJP has issued three line whip to its Mps
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.