६ वर्षीय नातवासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:28 PM2021-06-14T18:28:10+5:302021-06-14T18:29:59+5:30

west bengal violence: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या मोठा घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

west bengal violence tmc workers accused of gang rape women approach supreme court | ६ वर्षीय नातवासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव

६ वर्षीय नातवासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव

Next

नवी दिल्ली:पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या मोठा घटना घडल्याचे सांगितले जात आहे. अशातच एका महिलेने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. स्थानिक सरकारकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचे पीडित महिलेने सांगितले. (west bengal violence tmc workers accused of gang rape women approach supreme court)

पीडित महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली. पश्चिम बंगालमधील काही महिलांनी विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचारात सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर केला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल पक्षच सत्तेवर असल्यामुळे राज्य शासनाकडून योग्य न्याय मिळेल, असे वाटत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

तेलंगणचे माजी आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांचा भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांशी होता वाद!

६ वर्षाच्या नातवासमोर बलात्कार

सत्ताधारी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. ६० वर्षीय एका पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार ६ वर्षाच्या नातवासमोर तिचा बलात्कार केला गेला. दुसऱ्या अल्पवयीन पीडीतेने अपहरण करत बलात्कार करण्यात आल्याचे म्हटले आहे. पीडीतेच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तींनी म्हटले की, भाजपचा प्रचार करणाऱ्यांना शिक्षा देण्यात येईल. या दोन्ही महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विशेष तपास पथकाद्वारे तपास करण्याची मागणी केली आहे.

दिलासा! धारावीत शून्य रुग्णांची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

भरदिवसा कुऱ्हाडीने हत्या

मतदानानंतर झालेल्या हिंसाचारात भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून अर्ज दाखल करण्यात आला होता. ज्या महिलांनी अर्ज दाखल केला त्यापैकी एका महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या नवऱ्याने भाजपसाठी प्रचार केला होता. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ओळख पटवत भरदिवसा कुऱ्हाडीने त्यांची हत्या केली. मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराबाबत मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने बंगाल सरकारला नोटीस बजावली होती. 

दरम्यान, ४ मे रोजी रात्री तृणमूलचे कार्यकर्ते जबरदस्ती घरामध्ये शिरले आणि नातवासमोरच आपला बलात्कार केला असे वृद्ध महिलेने सांगितले. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी घरात लूट केल्याचा आरोप देखील या महिलेने केला आहे. ही घटना बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील घडली आहे. तृणमूलने बलात्कारासारख्या घटना घडवून आणल्या आहेत. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे बंगालमधील या घटनांना प्रोत्साहन दिले जात आहे असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात या महिलेने म्हटले आहे.
 

Web Title: west bengal violence tmc workers accused of gang rape women approach supreme court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.