'दंगाबाज', 'धंदाबाज' म्हणत ममतांचा भाजपवर 'चुन चुन के" हल्लाबोल; मोदींनांही घेतलं निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 03:48 PM2021-02-24T15:48:08+5:302021-02-24T15:54:28+5:30

हल्लोबोल करत ममता म्हणाल्या 'बंगालवर बंगालचेच शासन असेल. बंगालवर गुजरातचे शासन असणार नाही. मोदींचे बंगालवर शासन असणार नाही. गुंडे बंगालवर शासन करणार नाहीत.' (Mamata Banerjee attacks BJP)

West Bengal Mamata Banerjee attacks BJP in election rally in Hooghly | 'दंगाबाज', 'धंदाबाज' म्हणत ममतांचा भाजपवर 'चुन चुन के" हल्लाबोल; मोदींनांही घेतलं निशाण्यावर

'दंगाबाज', 'धंदाबाज' म्हणत ममतांचा भाजपवर 'चुन चुन के" हल्लाबोल; मोदींनांही घेतलं निशाण्यावर

Next

हुगळी -पश्चिम बंगालमधील हुगळी येथे आज ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी रॅली केली. यावेळी त्यांनी भाजपला 'दंगाबाज' आणि 'धंदाबाज', असे नाव दिले. एवढेच नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत मी गोल किपर असेल आणि भाजपला (BJP) एकही गोल करता येणार नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. (West Bengal Mamata Banerjee attacks BJP in election rally in Hooghly)

"भाजप नेहमीच म्हणते, की तृणमूल काँग्रेस 'टोलाबाज' आहे. मात्र, मी म्हणते, की भाजप 'दंगाबाज आणि धंदाबाज' आहे. नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे ‘दंगेबाज’ आहेत. 'विधानसभा निवडणुकीत मी गोलकीपर असेल आणि भाजपला एकही गोल करता येणार नाही.'

जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव का ? अमित शाह म्हणाले...

'बंगालवर गुजरातचे शासन नाही' -
हल्लोबोल करत ममता म्हणाल्या 'बंगालवर बंगालचेच शासन असेल. बंगालवर गुजरातचे शासन असणार नाही. मोदींचे बंगालवर शासन असणार नाही. गुंडे बंगालवर शासन करणार नाहीत.'

बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिथे घेतली रॅली, ती जागा तृणमूलने गंगाजल शिंपडून शुद्ध केली

'मोदींचे नशीब ट्रम्पपेक्षाही खराब' -
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना ममतांनी मोदींची तुलना थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्याशी केली. ममता म्हणाल्या, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षाही खराब नशीब पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत आहे. 

क्रिकेटर मनोज त‍िवारी टीएमसीत - 
बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर मोनोज तिवारी हुगळी येथील सहारगंज येथे सीएम ममता बॅनर्जी यांच्या रॅलीदरम्यान तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाला. मनोज तिवारी लवकरच राजकीय खेळीला सुरुवात करेल, असा कयास बऱ्याच दिवसांपासून लावला जात होता. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना हावडा शहरातून तिकिट दिले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

ममतांच्या राजवटीत पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत; नरेंद्र मोदी यांची टीका

Web Title: West Bengal Mamata Banerjee attacks BJP in election rally in Hooghly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.