West Bengal Election : जया बच्चन बंगालमध्ये TMC चा प्रचार करणार, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 09:19 PM2021-04-04T21:19:57+5:302021-04-04T21:20:35+5:30

jaya bachchan to campaign for tmc candidates for bengal polls : बंगालमधील टालीगंजमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अरुप विश्वास यांच्या समर्थनासाठी जया बच्चन रोड शो करणार आहेत.

West Bengal Election: jaya bachchan to campaign for tmc candidates for bengal polls | West Bengal Election : जया बच्चन बंगालमध्ये TMC चा प्रचार करणार, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता  

West Bengal Election : जया बच्चन बंगालमध्ये TMC चा प्रचार करणार, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता  

googlenewsNext
ठळक मुद्देबंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने बांग्ला निजेर मेयके चाय (बंगालला आपली कन्या हवी आहे) हा नारा दिला आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल (West bengal Assembly Election 2021) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमध्ये पराभव करण्यासाठी भाजपाने अभिनेता मिथुन चक्रवर्तींना प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या मदतीसाठी समाजवादी पार्टीच्या नेत्या आणि अभिनेत्री जया बच्चन यांना प्रचाराच्या रणांगणात उतरल्या आहेत. त्यामुळे बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. (jaya bachchan to campaign for tmc candidates for bengal polls)

जया बच्चन या आज रात्री कोलकाताला पोहोचणार आहेत. त्यानंतर उद्या 5 एप्रिल ते 8 एप्रिलपर्यंत त्या बंगालमध्ये राहणार आहेत. बंगालमधील टालीगंजमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अरुप विश्वास यांच्या समर्थनासाठी जया बच्चन रोड शो करणार आहेत. अरुप विश्वास यांच्या विरोधात भाजपाने केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना उतरवले आहे. 

याचबरोबर, जया बच्चन या तृणमूल काँग्रेसच्या इतरही उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. 6, 7 एप्रिल रोजी विविध विधानसभा मतदारसंघात जाऊन तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांसाठी रोड शो करतील. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने बांग्ला निजेर मेयके चाय (बंगालला आपली कन्या हवी आहे) हा नारा दिला आहे. जया बच्चन या बंगालच्या कन्या आहेत. आता त्या बंगालच्या दुसऱ्या कन्या ममतादीदींच्या प्रचाराला आल्या आहेत, असे सुब्रत मुखर्जी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या प्रचाराच्या लिस्टमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सपा नेते अखिलेश यादव आणि राजद नेते तेजस्वी यादव यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांना पत्रे लिहून भाजपाविरोधात राष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

Web Title: West Bengal Election: jaya bachchan to campaign for tmc candidates for bengal polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.