W Two killed in mob rally in Bengal | प. बंगालमध्ये गायी चोरल्याच्या संशयावरून जमावाची मारहाण; दोघांचा मृत्यू
प. बंगालमध्ये गायी चोरल्याच्या संशयावरून जमावाची मारहाण; दोघांचा मृत्यू

कुचबिहार (पश्चिम बंगाल) : दोन गायी चोरल्याच्या संशयावरून माथाबंगा (जिल्हा कुचबिहार) भागात गुरुवारी जमावाने केलेल्या मारहाणीत २ जणांचा मृत्यू झाल्यानंतर १४ जणांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. रबिऊल इस्लाम आणि प्रकाश दास हे व्हॅनमधून दोन गायी घेऊन निघाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमावाने ही व्हॅन थांबवून गायी ताब्यात घेतल्या. या गायी माथाबंगा भागातून काही दिवसांपूर्वी चोरी झालेल्या होत्या व जनावरांच्या तस्कराकडे नेल्या जात होत्या असा जमावाचा दावा होता. जमावाने नंतर त्या दोघांना मारहाण करून व्हॅन पेटवून दिली. पोलिसांनी त्या दोघांना रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
पश्चिम बंगाल विधानसभेने नुकतेच पश्चिम बंगाल विधेयक, (जमावाकडून हत्येला प्रतिबंध) २०१९ संमत केले असले तरी अद्याप त्याला राज्यपालांची संमती मिळालेली नाही.

Web Title: W Two killed in mob rally in Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.