ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, आता १ फेब्रुवारीला ‘संसद मार्च’ होणार? शेतकऱ्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

By बाळकृष्ण परब | Published: January 27, 2021 09:35 PM2021-01-27T21:35:52+5:302021-01-27T21:36:37+5:30

Farmer Protest : ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. या हिंसाचाराचे पडसाद शेतकरी आंदोलनामध्ये उमटले आहे.

Violence at tractor rallies, now 'Parliament March' on February 1? The farmers announced a big decision | ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, आता १ फेब्रुवारीला ‘संसद मार्च’ होणार? शेतकऱ्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, आता १ फेब्रुवारीला ‘संसद मार्च’ होणार? शेतकऱ्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकराने पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी काल आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. या हिंसाचाराचे पडसाद शेतकरी आंदोलनामध्ये उमटले आहे. ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने १ फेब्रुवारी रोजी होणारा संसद मार्च रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा मोर्चा सरकारी कारस्थानाची शिकार झाला. दीप सिद्धू हा आरएसएसचा एजंट आहे. दीप सिद्धू याने लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवून तिरंग्याचा अपमान केला आहे. त्यामुळे देश आणि आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.



बलबीर सिंह राजेवाल म्हणाले की, मी किसान मोर्चाच्यावतीने देशाची माफी मागतो. काल शेतकरी मोर्चाच्यावतीने देशाची माफी मागतो. काल शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा ऐतिहासिक होता. आम्ही २६ नोव्हेंबर रोजी येथे येऊन बसलो आहोत. काहीच अडचण झाली नाही. काही संघटना म्हणत होत्या लाल किल्ल्यावर जाऊ म्हणून. त्यांचे सरकारशी साटेलोटे होते. दीप सिद्धू ला संपूर्ण जगाने पाहिले. तो आरएसएसचा माणूस होता.

 

 

Web Title: Violence at tractor rallies, now 'Parliament March' on February 1? The farmers announced a big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.