स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:40 IST2025-12-02T16:38:03+5:302025-12-02T16:40:36+5:30
देशभरात हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
देशभरात हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदूरमध्ये एका २७ वर्षीय व्यक्तीचा स्कूटी दुरुस्त करण्यासाठी चालत जात असताना अचानक मृत्यू झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
परदेशीपुरा पोलीस स्टेशन परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. जनता क्वार्टर्समधील रहिवासी विनीत (२७) त्याची स्कूटी दुरुस्तीसाठी त्याच्या घराजवळील एका मेकॅनिककडे घेऊन जात होता.
इंदौर के जनता क्वार्टर क्षेत्र का यह वीडियो दिल दहलाने के लिए काफी है. जहां अपनी पंचर एक्टिवा को घसीटकर ले जा रहे इस युवक कि साइलेंट हार्ट अटैक से मौत हो गई. युवक की उम्र 27 साल बताई जा रही है.#Indore#HeartAttackpic.twitter.com/n8rWvQBqJQ
\— Nandini Laxakar (@LaxakarNandini) December 2, 2025
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ फुटेजमध्ये विनीत त्याची स्कूटी घेऊन जात असताना अचानक बेशुद्ध झाला आणि रस्त्यावर पडला, त्यानंतर तो उठूच शकला नाही. डॉक्टरांनी सुरुवातीला मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असल्याचं सांगितलं आहे.
अतिरिक्त डीसीपी अमरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, जवळच्या लोकांनी तरुणाला उपचारासाठी ताबडतोब रुग्णालयात नेलं, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.