Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 12:02 IST2025-12-07T12:02:05+5:302025-12-07T12:02:52+5:30
दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र त्याचवेळी एका लग्न सोहळ्यानिमित्त कंगना राणौत त्यांच्या राजकीय विरोधी खासदारांसोबत डान्सचा सराव करतानाही पाहायला मिळाल्या.

Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले
नवी दिल्ली - उद्योगपती ते राजकीय नेते बनलेले नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात खासदारांनी केलेला डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपा खासदार कंगना राणौत, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एकत्रित डान्स पाहायला मिळाला आहे.
या तीन खासदारांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध ओम शांती ओम या गाण्यावर नृत्य सादर केले. या व्हायरल व्हिडिओत कंगना राणौत, महुआ मोइत्रा आणि सुप्रिया सुळे यांनी एकसाथ दीवानगी दीवानगी या गाण्यावर नृत्य केले. त्यावेळी नवीन जिंदालही मंचावर होते. दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र त्याचवेळी एका लग्न सोहळ्यानिमित्त कंगना राणौत त्यांच्या राजकीय विरोधी खासदारांसोबत डान्सचा सराव करतानाही पाहायला मिळाल्या. त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवरील या फोटोत नवीन जिंदाल, महुआ मोइत्रा आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत संगीत कार्यक्रमात नृत्य सराव त्या करत होत्या.
हा फोटो पोस्ट करताना कंगना यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होते की, सहकारी खासदारांसोबत सिनेमातील क्षण अनुभवले. नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमानिमित्त सराव करण्यात आला असं त्यांनी सांगितले होते. नवीन जिंदाल यांची मुलगी यशस्विनी जिंदाल हिचं ५ डिसेंबर रोजी लग्न पार पडले. या लग्न सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात मंचावर ३ खासदार बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकले. ४ डिसेंबरला संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. यशस्विनी हिचं लग्न शाश्वत सोमानी याच्याशी होत आहे. शाश्वत हा प्रसिद्ध उद्योगपती संदीप सोमानी आणि सुमिता यांचा मुलगा आहे. हा भव्य लग्न सोहळा दिल्लीत पार पडला. जिथे विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती.
Kangana Ranaut, Mahua Moitra, Supriya Sule performing in wedding of Naveen Jindal’s daughter pic.twitter.com/lARD6SVRuU
— Angoori (@Rodrigo60776560) December 6, 2025