इंटरनेटच्या वापरात शहरी ग्रामीण भागांमध्ये तफावत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:54 AM2019-11-27T03:54:18+5:302019-11-27T03:54:35+5:30

ग्रामीण भागातील जवळपास ४.४ टक्के, तर शहरी भागातील २३.४ टक्के लोकांकडे कॉम्प्यूटर आहे.

Variations in urban rural areas using the Internet | इंटरनेटच्या वापरात शहरी ग्रामीण भागांमध्ये तफावत

इंटरनेटच्या वापरात शहरी ग्रामीण भागांमध्ये तफावत

Next

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील जवळपास ४.४ टक्के, तर शहरी भागातील २३.४ टक्के लोकांकडे कॉम्प्यूटर आहे. १४.९ टक्के ग्रामीण आणि ४२ टक्के शहरी कुटुंबांकडे इंटरनेट सुविधा असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

‘घरगुती सामाजिक उपयोग : शिक्षण’ यावर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने हे सर्वेक्षण केले. यात असे दिसून आले की, ग्रामीण भागातील ५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ९.९ टक्के व्यक्ती कॉम्प्यूटर आॅपरेट करण्यात सक्षम होते. १३ टक्के इंटरनेटचा उपयोग करण्यात सक्षम होते, तसेच गत ३० दिवसांपासून १०.८ टक्के लोक इंटरनेटचा उपयोग करीत होते. शहरी भागात ५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ३२.४ टक्के लोक कॉम्प्यूटर संचलित करण्यात सक्षम होते. ३७.१ टक्के लोक इंटरनेटचा उपयोग करण्यात सक्षम होते. गत ३० दिवसांपासून ३३.८ टक्के लोक इंटरनेटचा उपयोग करीत आहेत.

७ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयातील लोकांचा साक्षरता दर ७७.७ टक्के आहे. हा दर ग्रामीण भागात ७३.५ टक्के तर शहरी भागात ८७.७ टक्के आहे. ग्रामीण भागात जे १५ वर्षे वा त्याहून अधिक वयाची आहेत त्यांनी माध्यमिक वा त्यापेक्षा अधिक शिक्षण पूर्ण केले आहे.

शिक्षणातही फरक
१५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या १०.६ टक्के व्यक्तींनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ५.७ टक्के आणि शहरी भागात २१.७ टक्के आहे. या सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, प्राथमिक स्तरावर उपस्थितीचे प्रमाण १०१.२ टक्के होते, तर उच्च प्राथमिक, माध्यमिक स्तरावर हे प्रमाण ९८.७ टक्के होते.

Web Title: Variations in urban rural areas using the Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.