वाघ, कुंकळयेकरांना मिळणार महामंडळ
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:26+5:302015-03-06T23:07:26+5:30
(वाघ व सिद्धार्थ यांच्या चेहर्याचे फोटो वापरावेत)

वाघ, कुंकळयेकरांना मिळणार महामंडळ
(व ाघ व सिद्धार्थ यांच्या चेहर्याचे फोटो वापरावेत)पणजी : भाजपचे सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ आणि पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर या दोघांनाही एकाच वेळी एखादे महामंडळ सरकारकडून दिले जाणार आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्या दृष्टीने सकारात्मक विचार चालविला असल्याची माहिती मिळाली.जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येण्याची वाट मुख्यमंत्री पार्सेकर हे पाहात आहेत, असे सूत्रांनी सांगितले. येत्या २० रोजी जिल्हा पंचायतीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केल्यानंतर मग निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर वाघ व कुंकळयेकर या दोघांनाही शासकीय पदे दिली जाणार आहेत. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना वाघ यांच्याकडून मनोरंजन संस्था आणि कला अकादमी या दोन्ही संस्थांवरील पदे काढून घेण्यात आली. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री पार्सेकर यांनी वाघ यांच्याबाबत सहानुभूती दाखवली. वाघ यांना पुन्हा कला अकादमीवरील पद द्यायला हवे, असा विचार मुख्यमंत्र्यांनी चालविल्याचे कळते. याविषयी मुख्यमंत्री व संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्यात यापुढे बोलणी होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. वाघ यांची काही कामेही मुख्यमंत्र्यांनी अलीकडे केली आहेत. वाघ यांच्या मनात भाजपविषयी असलेला राग पूर्णपणे शमविण्यात पार्सेकर यांना यश आले आहे. पार्सेकर यांनी नम्रपणे व कौशल्याने वाघ यांचा विषय हाताळला, याची कल्पना पर्रीकर आणि भाजपमधील अन्य आमदारांनाही आली आहे.दरम्यान, कुंकळयेकर यांना साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले जाईल, अशी चर्चा असली तरी, प्रत्यक्षात कुंकळयेकर यांना दुसरे एखादे महामंडळ दिले जाण्याची दाट शक्यता आहे. कुंकळयेकर यांना एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपदच मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्षपद हे आमदार प्रमोद सावंत यांच्याकडे आहे. (खास प्रतिनिधी)