Uttarakhand Disaster : उत्तराखंडमधील चमोलीत धरण फुटल्याने हाहाकार, पंतप्रधान मोदी, शाह यांनी घेतला परिस्थितीचा आढावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 03:56 PM2021-02-07T15:56:59+5:302021-02-07T15:57:13+5:30

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शी फोनवरून संपर्क साधला असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. NDRF च्या काही टीम बचाव कार्यासाठी गेल्या असून काही टीम दिल्लीहून Airlift करून उत्तराखंडला पाठविण्यात येत आहेत. (Uttarakhand Disaster updates)

Uttarakhand Disaster updates Nanda devi glacier break in chamoli joshimath rescue ops underway Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi | Uttarakhand Disaster : उत्तराखंडमधील चमोलीत धरण फुटल्याने हाहाकार, पंतप्रधान मोदी, शाह यांनी घेतला परिस्थितीचा आढावा 

Uttarakhand Disaster : उत्तराखंडमधील चमोलीत धरण फुटल्याने हाहाकार, पंतप्रधान मोदी, शाह यांनी घेतला परिस्थितीचा आढावा 

googlenewsNext

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीला महापूर आला आहे. नदीचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे. जवळपासच्या भागातही पाणी पसरण्याची शक्यता आहे. तसेच काही भागातून लोकांना बाहेर काढण्याचे कामही सुरू आहे. येथील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प वाहून गेला असून या प्रकल्पासाठी काम करत असलेले 100 ते 150 कामगार बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. (Nanda devi glacier break in chamoli joshimath rescue ops underway)

आयटीबीपी, NDRF आणि SDRG च्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वारला अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत घटना स्थळी रवाना झाले आहेत.

सर्वतोपरी मदत करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन -
यासंदर्भात, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शी फोनवरून संपर्क साधला असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच शक्य ती सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

NDRF च्या आणखी टीम रवाना-शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले आहे, की "उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीसंदर्भात माहिती मिळताच, मी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावतजी, DG ITBP व DG NDRF यांच्याशी चर्चा केली. संबंधित सर्व अधिकारी लोकांच्या संरक्षणासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. NDRF च्या काही टीम बचाव कार्यासाठी गेल्या असून काही टीम दिल्लीहून Airlift करून उत्तराखंडला पाठविण्यात येत आहेत. तेथीस परिस्थितीवर आणचे सातत्याने लक्ष आहे. देवभूमीला शक्य ती सर्व प्रकारची मदत केली जाईल.

पीडितांना सरकारने तत्काळ मदत पुरवावी - राहुल गांधी
यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे, की चमोली येथे हिमकडा कोसळल्याने निर्माण झालेली पूरजन्य परिस्थिती अत्यंत दुःखद आहे. माझ्या संवेदना उत्तराखंडमधील जनतेसोबत आहेत. राज्य सरकारने पीडितांना तत्काळ मदत पुरवावी. तसेच काँग्रेसच्या सहकाऱ्यांनीही बचाव कार्यात मदत करावी.


 

Web Title: Uttarakhand Disaster updates Nanda devi glacier break in chamoli joshimath rescue ops underway Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.