Uttarakhand Assembly Election: गटबाजीमध्ये अडकले उत्तराखंडचे राजकारण; काँग्रेस, भाजपत गटबाजीला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:21 AM2022-01-21T06:21:07+5:302022-01-21T06:23:51+5:30

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते खेचताहेत स्वपक्षीयांचे पाय

Uttarakhand Assembly Election politics embroiled in factionalism | Uttarakhand Assembly Election: गटबाजीमध्ये अडकले उत्तराखंडचे राजकारण; काँग्रेस, भाजपत गटबाजीला उधाण

Uttarakhand Assembly Election: गटबाजीमध्ये अडकले उत्तराखंडचे राजकारण; काँग्रेस, भाजपत गटबाजीला उधाण

Next

- शरद गुप्ता

नवी दिल्ली : भाजपने जाहीर केलेल्या उत्तराखंडच्या ५९ उमेदवारांच्या यादीतून रितू खंडूरी यांचे नाव वगळण्यात आले. त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री मेजर जनरल (सेवानिवृत्त) भुवनचंद्र खंडूरी यांच्या कन्या आहेत व पौडी गढवालच्या यमकेश्वर मतदारसंघातून विद्यमान आमदारही आहेत. भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा हा परिणाम समजला जात आहे.

आणखी एक माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक ज्यांना नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळातून हटविण्यात आले, त्यांचेही राज्याच्या राजकारणावर बारीक लक्ष असते. अन्य एक माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. परंतु उत्तराखंडच्या राजकारणात जास्त रस दाखवतात. त्यांच्याबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट आणि राज्यसभा सदस्य व भाजपचे राष्ट्रीय प्रभारी अनिल बलूनी यांचीही राजकारणात चलती आहे. 

काँग्रेसमध्येही फूट
दुसरीकडे काँग्रेसमध्येही एकजूट नाही. माजी मुख्यमंत्री व मुख्यमंत्री पदाचे घोषित उमेदवार हरीश रावत यांचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल व विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह यांच्याशी फारसे पटत नाही.
 
मगरींमध्ये अडकलो
तिघांच्या हस्तक्षेपाने संतप्त झालेले हरीश रावत यांनी मागील महिन्यात निवडणूक लढण्यास नकार दिला होता. पक्ष सोडण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. ट्विटरवर त्यांनी म्हटले होते की, ज्या संघटनेला मला प्रत्येक बाबीमध्ये साथ द्यायला पाहिजे, ते प्रत्येक बाबतीत विरोध करीत आहेत. माझ्या भोवती मगरींना सोडले आहे. ज्यांच्या आदेशावर पोहायचे आहे, त्यांचे समर्थक हातपाय बांधत आहेत. आता विचार येतोय की, फार पोहून झाले. आता विश्रांती करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Uttarakhand Assembly Election politics embroiled in factionalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.