उत्तर प्रदेशने साधला चर्मोद्योगांशी संपर्क; आग्रा येथे येणार जर्मन कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:10 PM2020-05-24T23:10:33+5:302020-05-24T23:11:08+5:30

पंजाबचेही प्रयत्न सुरू

 Uttar Pradesh makes contact with leather industry; The German company will come to Agra | उत्तर प्रदेशने साधला चर्मोद्योगांशी संपर्क; आग्रा येथे येणार जर्मन कंपनी

उत्तर प्रदेशने साधला चर्मोद्योगांशी संपर्क; आग्रा येथे येणार जर्मन कंपनी

Next

लखनौ/चंदीगड : भारतातील चर्मोद्योगाचे आघाडीचे केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एका जर्मन पादत्राणे निर्मितीच्या कंपनीने चीनमधील आपले प्रकल्प बंद करून आग्रा येथे येण्याचा निर्णय घेतला आहे. आता आणखी चर्माेद्योगातील कंपन्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकारने सुरू केला आहे. त्याचबरोबर पंजाबनेही कंपन्यांनी आपल्या राज्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

गत सप्ताहामध्ये जर्मनीमधील आघाडीची पादत्राणे उत्पादक कंपनी कासा इव्हर्जने आपले चीनमधील दोन उत्पादन प्रकल्प बंद करून ते उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये ११० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे जाहीर झाले आहे.

जर्मन कंपनीच्या या निर्णयामुळे चीनमधील उद्योगांना आपल्या राज्यात आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. आता यासाठी उत्तर प्रदेशबरोबरच पंजाबनेही प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशचे एमएसएमई आणि गुंतवणूक मंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांनी सांगितले की, आम्ही चीन आणि ब्राझीलमधील काही चर्माेउद्योगांशी संपर्क साधला असून, त्यांनी त्यांचे उत्पादन प्रकल्प उत्तर प्रदेशामध्ये आणावेत, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.या प्रयत्नांना लवकरच यश येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान पंजाब सरकारने विविध दूतावासांना पत्र लिहून त्यांचे कारखाने पंजाबमध्ये आणल्यास त्यांना मदत देण्याचे कळविले आहे.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, आम्ही जपान, कोरिया आणि तैवानच्या राजदूतांना पत्रे पाठविली आहे. पंजाबमध्ये येणाऱ्या उद्योगांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

पाच लाख जोड तयार करण्याची वार्षिक क्षमता

भारतात येणाºया जर्मन उद्योगाची सध्या चीनमध्ये वार्षिक पाच लाख जोड तयार करण्याची क्षमता आहे. येत्या दोन वर्षामध्ये भारतीय प्रकल्पातूनही पाच लाख जोड तयार केले जाणार आहेत. यासाठी लॅट्रिक इंडस्ट्रीजबरोबर त्यांनी सहकार्य करार केला आहे. जर्मन उद्योग पहिल्या टप्प्यात ११० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यामुळे रोजगार निर्मितीही होणार आहे. भारत हा पुढील काळात जगात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून उदयाला येण्याची शक्यता आहे.

Web Title:  Uttar Pradesh makes contact with leather industry; The German company will come to Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.