हाथरस प्रकरण : बाबरी प्रकरणाच्या निकालामुळे रात्री केला अंत्यसंस्कार, सर्वोच्च न्यायालयात यूपी सरकारचे शपथपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 02:04 PM2020-10-06T14:04:35+5:302020-10-06T14:09:56+5:30

योध्या-बाबरी प्रकरणामुळे जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच कोरोनामुळे गर्दी न होऊ देण्याचा उल्लेखही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात केला आहे. (Uttar Pradesh government, Hathras gangrape)

Uttar Pradesh government affidavit in supreme court about Hathras gangrape case   | हाथरस प्रकरण : बाबरी प्रकरणाच्या निकालामुळे रात्री केला अंत्यसंस्कार, सर्वोच्च न्यायालयात यूपी सरकारचे शपथपत्र

हाथरस प्रकरण : बाबरी प्रकरणाच्या निकालामुळे रात्री केला अंत्यसंस्कार, सर्वोच्च न्यायालयात यूपी सरकारचे शपथपत्र

Next
ठळक मुद्देकुटुंबीयांच्या परवानगीनंतर आणि हिंसेपासून बचावासाठी आर्ध्या रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार - UP सरकारयासंदर्भात पोलिसांना 14 सप्टेंबरला माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ पावले उचलली. हाथरसमध्ये मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी - UP सरकार

नवी दिल्ली - हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यात उत्तर प्रदेश सरकारने विरोधकांवर जातीय दंगे पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात, कुटुंबीयांच्या परवानगीनंतर आणि हिंसेपासून बचावासाठी आर्ध्या रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही म्हटले आहे. 

अयोध्या-बाबरी प्रकरणामुळे जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच कोरोनामुळे गर्दी न होऊ देण्याचा उल्लेखही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात केला आहे. यूपी सरकारने म्हटले आहे, की अयोध्या-बाबरी प्रकरणात आलेल्या निकालाची संवेदनशीलता लक्षात घेत पीडितेच्या कुटुंबीयांच्या परवानगीने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दंगली घडविण्याचे नियोजित प्रयत्न - 
यासंदर्भात पोलिसांना 14 सप्टेंबरला माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ पावले उचलली. एवढेच नाही, तर या प्रकरणाचा वापर करून जातीय आणि सांप्रदायिक दंगली घडविण्यासाठी राजकीय पक्षांचे काही वर्ग, सोशल मीडिया, काही वर्गांच्या प्रिंट आणि इलेक्ट्रानिक मिडियाने नियोजित प्रयत्न केला, असेही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात म्हटले आहे.

हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी - 
हाथरसमध्ये मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यूपी सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. एवढेच नाही, तर आपणही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकतो. मात्र, निष्पक्ष तपास होऊ नये, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत, असेही यूपी सरकारने म्हटले आहे.

सकाळच्या सुमारास हिंसाचार होण्याचे इनपूट होते - 
यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात, अर्ध्यारात्री अंत्यसंस्कार का करावा लागला? याचे कारणही सांगितले आहे. यानुसार, संबंधित मुलीच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्याची तयारी सुरू आहे, असे इनपूटही गुप्तचर संस्थांकडे होते. जर, सकाळपर्यंत वाट पाहिली असती, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. यामुळे संबंधित मुलीच्या कुटुंबीयांच्या परवानगीनेच रात्री मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Uttar Pradesh government affidavit in supreme court about Hathras gangrape case  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.