Uttar Pradesh Election 2022: अवघ्या २४ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री; १९९३ पासून आतापर्यंत आमदार, कोण आहे राजा भैय्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 04:10 PM2022-01-26T16:10:16+5:302022-01-26T16:10:31+5:30

रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९६७ मध्ये प्रतापगड येथील भदरी येथे झाला

Uttar Pradesh Election 2022: Entry into politics at just 24 years; MLA from 1993 till now, who is Raja Bhaiya? | Uttar Pradesh Election 2022: अवघ्या २४ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री; १९९३ पासून आतापर्यंत आमदार, कोण आहे राजा भैय्या?

Uttar Pradesh Election 2022: अवघ्या २४ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री; १९९३ पासून आतापर्यंत आमदार, कोण आहे राजा भैय्या?

googlenewsNext

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्व पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. अशावेळी प्रचाराच्या रणांगणात दबंग नेत्यांची कमी नाही. जे त्यांच्या प्रतिमेमुळे निवडणुकीत प्रभाव पाडतात. त्यात एक नाव म्हणजे माजी कॅबिनेट मंत्री रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या, ज्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत बाजी मारली.

रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९६७ मध्ये प्रतापगड येथील भदरी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उदय प्रताप सिंह आणि आईचं नाव मंजुल राजे होतं. त्यांची आईही राज घराण्यातून आहे. राज भैय्याला तूफान सिंह नावानंही ओळखलं जातं. त्यांना घोडेस्वारीचा नाद आहे. एकदा घोड्यावरुन पडलेल्या त्यांना मोठी दुखापत झाली होती. त्याशिवाय बुलेट आणि जिप्सी चालवण्यासह हेलिकॉप्टरनं प्रवास करणं हा त्यांचा छंद आहे. १९९३ च्या विधानसभा निवडणुकीत राजा भैय्या यांनी राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून ते सातत्याने आमदार आहेत.

एकेकाळी मुलायम सिंह यादव यांनी रघुराज प्रताप सिंह यांच्यावर दंगलीत सहभागी असल्याचा आरोप केला होता. राजा भैय्या त्यांचे वडील उदय प्रताप सिंह यांना खूप घाबरतात. लहानपणी त्यांनी वडिलांच्या नजरेला नजर मिळवली नाही. राजा भैय्याकडे जवळपास २०० कोटींहून अधिक संपत्ती आहे. एकदा यूपीत विधानसभा निवडणुकीत राजा भैय्याविरोधात प्रचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह स्वत: पोहचले होते. मात्र तरीही याठिकाणी भाजपाचा उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता.

त्यानंतर राजा भैय्या यांना गुंडा म्हणून संबोधणारे कल्याण सिंह यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात राजा भैय्याचा समावेश केला. राजा भैय्या यांनीही प्रामाणिकपणे काम केले. जेव्हा बसपा सुप्रीमो मायावती यांनी तत्कालीन भाजपा सरकारचं समर्थन मागे घेतले तेव्हा राजा भैय्याने सरकार वाचवण्यासाठी कल्याण सिंह यांची खूप मदत केली. मात्र त्यानंतर बसपा सरकार आलं आणि राजा भैय्या यांच्यावर पोटा कायद्यातंर्गत कारवाई केली. त्यांना जेलमध्ये पाठवलं. २००३ मध्ये मायावती सरकारने भदरी येथील राजा भैय्या यांच्या वडिलांच्या महालावर छापेमारी केली.

२०१२ मध्ये समाजवादी पक्षाचं सरकार बनलं. राजा भैय्या यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. परंतु त्यावेळी प्रतापगडच्या कुंडा येथे हायप्रोफाईल मर्डर झाला. ज्यात डिप्टी एसपी जिया उल हक यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात राजा भैय्या यांचे नाव आले. ज्यामुळे अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली. त्यानंतर राजा भैय्याला क्लीनचीट मिळाली. तेव्हा ८ महिन्यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळात राजा भैय्याचा समावेश झाला. राजा भैय्या यांच्यावर अनेक खूनाचे आरोप आहेत.

यंदाच्या निवडणुकीत राजा भैय्या यांनी स्वत:चा पक्ष बनवला आहे. ज्याचं नाव जनसत्ता दल लोकतांत्रिक असं ठेवलंय. त्यांच्या नव्या पक्षाचं चिन्ह निवडणूक आयोगाने करवत दिली आहे. आता या निवडणुकीत राजा भैय्याचा पक्ष काय कमाल दाखवतो ते पाहणं गरजेचे आहे.

Web Title: Uttar Pradesh Election 2022: Entry into politics at just 24 years; MLA from 1993 till now, who is Raja Bhaiya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.