Uttar Pradesh Assembly Election 2022 : बिकीनी गर्लला हस्तीनापूरमधून तिकीट दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 09:57 PM2022-01-16T21:57:31+5:302022-01-16T21:58:24+5:30

हिंदू महासभेनं अर्चना गौतमच्या उमेदवारीला आक्षेप घेतला आहे. हस्तीनापूर या धार्मिक स्थळ असलेल्या मतदारसंघात अर्चना गौतमला तिकीट देऊन काँग्रेसने हिंदू आणि जैन धर्मियांच्या भावना दुखावल्याचं हिंदू महासभेनं म्हटलं आहे

Uttar Pradesh Assembly Election 2022 : Pro-Hindu organizations angry over giving ticket to Bikini Girl archana gautam from Hastinapur | Uttar Pradesh Assembly Election 2022 : बिकीनी गर्लला हस्तीनापूरमधून तिकीट दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांचा संताप

Uttar Pradesh Assembly Election 2022 : बिकीनी गर्लला हस्तीनापूरमधून तिकीट दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांचा संताप

Next

लखनौ - उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. तिकिट वाटपात महिलांना प्राधान्य देण्याची घोषणा करत प्रियंका गांधींनी १२५ उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये ४० टक्के महिलांना तिकीट दिले आहे. त्यात अभिनेत्री अर्चना गौतम हिचेही नाव आहे. तिला मेरठमधील हस्तिनापूरमधून तिकीट देण्यात आले आहे. बिकीनी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अर्चना गौतमला तिकीट दिल्याने हिंदुत्ववादी संघटना भडकल्या आहेत. 

हिंदू महासभेनं अर्चना गौतमच्या उमेदवारीला आक्षेप घेतला आहे. हस्तीनापूर या धार्मिक स्थळ असलेल्या मतदारसंघात अर्चना गौतमला तिकीट देऊन काँग्रेसने हिंदू आणि जैन धर्मियांच्या भावना दुखावल्याचं हिंदू महासभेनं म्हटलं आहे. मात्र, अर्चनाने टीकाकारांकडे दुर्लक्ष केलं असून माझा जन्म हस्तीनापूरचा आहे, त्यामुळे मी आतून-बाहेरुन या शहराला ओळखते. धार्मिक पर्यटनासाठी हे शहर ओळखले जाते. मात्र, दळणवळणाची साधनं अधिक नसल्याने येथे पर्यटन बहरले नाही, असे अर्चनाने म्हटले आहे. तसेच, निवडून आल्यानंतर सर्वप्रथम बस स्टँड आणि रेल्वे सुविधाला प्राधान्य देणार असल्याचंही अर्चनाने म्हटलं आहे. जे लोकं माझे बिकीनीतील फोटो शेअर करतात, ते त्यांची मानसिकता दाखवून देतात, असा टोलाही तिने लगावला. 

अर्चना गौतम अभिनेत्री, मॉडेल आणि ब्युटी पेजेंट विजेता आहे. अर्चना गौतम ही २०१४ मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती. त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती. तिने मिस कॉसमॉस वर्ल्ड २०१८ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. अचर्ना गौतम हिने मेरठमधील आयआयएमटीमधून बीजेएमसी विषयात पदवी घेतली होती. तिने मोस्ट टॅलेंट २०१८चे उपविजेतेपदही पटकावले होते. अर्चना गौतम हिने २०१५ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अर्चना गौतम हिने विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती श्रद्धा कपूरच्या हसिना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटात दिसली होती. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत तिला बिकिनी गर्ल म्हणून ओळखले जाते.

मलेशियामध्ये मिस टॅलेंट २०१८ चे विजेतेपद पटकावत अर्चना गौतमने अजून एक यश मिळवले होते. ब्युटी पेजेंट जिंकल्यापासून अर्चना गौतम मॉडेलिंगच्या जगात कार्यरत आहेत. तसेच ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या जंक्शन वाराणसी चित्रपटामध्ये अर्चना गौतम हिने एक आयटम नंबर केला होता. त्याशिवाय तिने टी-सीरिजच्या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले होते. त्याशिवाय तिने पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांच्या म्युझिक व्हिडीओमध्येही ती दिसली होती.

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावल्यानंतर अर्चना गौतम ही दक्षिणेतील चित्रपटांचा भाग बनण्यासाठी सज्ज झाली आहे. ती IPL it’s Pure Love या तेलुगू आणि Gundas आणि 47A या तामिळ चित्रपटांमध्ये काम करत आहे. अर्चना गौतम हिला २०१८ मध्ये Dr. S. Radhakrishnan Memorial Awards ने सन्मानित करण्यात आले होते. तर २०१८ मध्येच तिला  Women Achiever Award by GRT पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता राजकारणाच्या आखाड्यात ती चमक दाखवते की नाही, हे पाहावे लागेल.
 

Web Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 : Pro-Hindu organizations angry over giving ticket to Bikini Girl archana gautam from Hastinapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.