UP assembly elections 2022: 'समाजवादी पार्टीकडे नाव लिहा अन् 300 युनिट मोफत वीज मिळवा', उद्यापासून अभियान सुरू; अखिलेश यादवांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 03:07 PM2022-01-18T15:07:09+5:302022-01-18T15:08:28+5:30

UP assembly elections 2022: समाजवादी पार्टीचे हे अभियान उद्यापासून (बुधवार) सुरू होणार आहे. वीज बिलावर जे नाव येईल, ते यादीत लिहावे. समाजवादी पार्टी घरोघरी जाऊन लोकांची नावे लिहिणार आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.

UP elections: Scheme for up to 300 units free electricity to be launched tomorrow, says Akhilesh Yadav | UP assembly elections 2022: 'समाजवादी पार्टीकडे नाव लिहा अन् 300 युनिट मोफत वीज मिळवा', उद्यापासून अभियान सुरू; अखिलेश यादवांची घोषणा

UP assembly elections 2022: 'समाजवादी पार्टीकडे नाव लिहा अन् 300 युनिट मोफत वीज मिळवा', उद्यापासून अभियान सुरू; अखिलेश यादवांची घोषणा

googlenewsNext

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोठी घोषणा केली आहे. समाजवादी पार्टी एक अभियान सुरू करत आहे. ज्या घरगुती ग्राहकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज हवी आहे, त्यांनी आपली नावे नोंदवावीत. समाजवादी पार्टीचे हे अभियान उद्यापासून (बुधवार) सुरू होणार आहे. वीज बिलावर जे नाव येईल, ते यादीत लिहावे. समाजवादी पार्टी घरोघरी जाऊन लोकांची नावे लिहिणार आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.

काही लोकांनी वीजही लावली नाही, तरीही त्यांच्या नावावर वीज बिल आले. यूपी सरकारने अनेक महिन्यांपासून वीज बिल पाठवलेले नाही. निवडणूक आयोगाच्या प्रोटोकॉलचे पालन करून संपूर्ण राज्यात अभियान राबविण्यात येणार आहे. समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांची नावे लिहिणार आहेत. आम्ही यूपीमध्ये समृद्धीसाठी काम करू, असे अखिलेश यादव म्हणाले. 

समाजवादी पार्टीची मान्यता संपुष्टात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अखिलेश यादव म्हणाले की, मान्यता संपली तर ती भाजपाचीही संपेल, कारण भाजपामध्ये सर्वाधिक गुन्हेगार आहेत. भाजपाने सर्वाधिक आमदार विधानसभेत आणले आहेत, असे सांगत अखिलेश यादव यांनी भाजपावर निशाणा साधला.

याचबरोबर, अखिलेश यादव म्हणाले की, समाजवादी पार्टीच्या जाहीरनाम्याबाबत जनतेकडून सातत्याने सूचना येत आहेत. भाजपाचा जाहीरनामा आल्यानंतर समाजवादी पार्टी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. ज्यांनी आम्हाला निवेदन दिले त्यांचे शब्द जाहीरनाम्यात समाविष्ट केले जातील. याशिवाय, अखिलेश यादव म्हणाले की, तेव्हा आमच्या सरकारमध्ये 18 लाखांहून अधिक लॅपटॉप देण्यात आले. आजही तुम्ही जाऊन त्या मुलांना भेटलात तर लक्षात येईल की त्यांना लॅपटॉपचा किती फायदा झाला? त्यातले काही अभ्यासात पुढे गेले तर काही नोकरीला लागले.
 

Web Title: UP elections: Scheme for up to 300 units free electricity to be launched tomorrow, says Akhilesh Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.