Unnao Rape Case: उन्नाव पीडितेच्या वडिलांची हत्या; सेंगरला १0 वर्षे जेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:30 AM2020-03-14T01:30:17+5:302020-03-14T01:30:54+5:30

पीडिता कुटुंबातील काही सदस्य आणि वकिलांसमवेत कारने प्रवास करीत असताना जुलै २०१९ मध्ये एका ट्रकने कारला ठोकरले.

Unnao Rape Case: Unnao victim's father killed; Sanger faces up to 10 years in prison | Unnao Rape Case: उन्नाव पीडितेच्या वडिलांची हत्या; सेंगरला १0 वर्षे जेल

Unnao Rape Case: उन्नाव पीडितेच्या वडिलांची हत्या; सेंगरला १0 वर्षे जेल

Next

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कारपीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने भाजपचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. बलात्कारपीडितेचे वडील न्यायालयीन कोठडीत असताना ९ एप्रिल २०१८ रोजी मृत्यू झाला होता. जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांचे भाऊ अतुल सिंह सेंगरला पीडितेच्या कुटुंबियास भरपाईपोटी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

४ मार्च रोजी कोर्टाने कुलदीप सिंह सेंगरला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले होते. या खटल्यात कोर्टाने कुलदीप सिंह सेंगरसह सात जणांना दोषी ठरविले होते. तथापि, कुलदीप सिंह सेंगरने पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी आपला सहभाग असल्याचा इन्कार केला होता, तसेच आपण काहीही गैर केले नसल्याचे म्हटले होते. बलात्काराच्या एका अन्य खटल्यात कुलदीप सेंगरला मागच्या वर्षी २० डिसेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली होती.

२०१७ मध्ये सेंगरने पीडितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती. कुलदीप सेंगरसह माखी पोलीस ठाणे अधिकारी अशोकसिंह भदौरिया, तत्कालीन पोलीस निरीक्षक के.पी. सिंह, विनीत मिश्रा, बिरेंद्र सिंह, शशि प्रताप सिंह, सुमन सिंह आणि सेंगरचा भाऊ अतुल यांना भा.दं.वि. कलम १२० बी आणि अन्य कलमांतहत दोषी ठरविण्यात आले. कोर्टाने संशयचा फायदा देत कॉन्स्टेबल आमिर खान, शैलेंद्र सिंह, रमण शरण सिंह आणि शरदवीर सिंह यांची सुटका केली.

पीडिता कुटुंबातील काही सदस्य आणि वकिलांसमवेत कारने प्रवास करीत असताना जुलै २०१९ मध्ये एका ट्रकने कारला ठोकरले. या दुर्घटनेत पीडितेच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. पीडितेला लखनौतील एका इस्पितळातून विमानाने दिल्लीतील एम्स इस्पितळात दाखल करणयात आले होते. पीडिता सध्या आरपीपीएफच्या सुरक्षेत आहे.

एप्रिल २0१८ मध्ये नेमके काय झाले होते?
३ एप्रिल २०१८ रोजी पीडितेचे वडील आणि शशि प्रताप सिंह यांच्यात वाद झाला होता. पीडितेचे वडील सहकाऱ्यांसोबत गावी परतत असताना त्यांनी सिंह यांना आपल्या वाहनातून सोडण्याची विनंती केली होती. सिंहने नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. सिंहने साथीदारांना बोलावले. त्यानंतर कुलदीप सेंगरचा भाऊ अतुल इतर लोकांसोबत घटनास्थळी पोहोचला आणि पीडितेच्या वडिलांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. नंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन पीडितेच्या वडिलांसह इतरांना अटक करण्यात आली होती, असे सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले होते.

Web Title: Unnao Rape Case: Unnao victim's father killed; Sanger faces up to 10 years in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.