केरळच्या किनाऱ्याजवळ अज्ञात बेट? अनेकांना आश्चर्य; तपासानंतर चित्र होईल स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 06:18 AM2021-06-19T06:18:14+5:302021-06-19T06:18:25+5:30

गुगल मॅप्सने हे उघड केल्यावर चेल्लानाम कार्शिका टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटीने कुफोसला पत्र लिहिल्यानंतर तज्ज्ञांसह अनेक जण गोंधळून गेले.

An unknown island off the coast of Kerala? Many wonder | केरळच्या किनाऱ्याजवळ अज्ञात बेट? अनेकांना आश्चर्य; तपासानंतर चित्र होईल स्पष्ट

केरळच्या किनाऱ्याजवळ अज्ञात बेट? अनेकांना आश्चर्य; तपासानंतर चित्र होईल स्पष्ट

Next

कोची (केरळ) : केरळच्या किनाऱ्याजवळ बेट आहे का? भारताच्या पश्चिम किनाऱ्याला केरळपासून दूर नव्या द्वीदल धान्याच्या आकारासारखी असलेली त्याची रचना गुगल मॅप्सने दाखवल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले आहे. बेटासारखी असलेली रचना अरबी समुद्रात आढळलेली नाही, असे वृत्त न्यूज मिनिटने केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीजच्या (केयुएफओएस-कुफोस) अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले. आतापर्यंत दृष्टीस न पडलेली पण पाण्याखाली काही नवी रचना आहे का? याची तपासणी तज्ज्ञ करतील.

गुगल मॅप्सने हे उघड केल्यावर चेल्लानाम कार्शिका टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटीने कुफोसला पत्र लिहिल्यानंतर तज्ज्ञांसह अनेक जण गोंधळून गेले. गुगल मॅप्सने ज्या रचनेची प्रतिमा दाखविली ती केरळच्या किनाऱ्यापासून थोडीशीच दूर आहे. तिचा आकार हा कोचीच्या सुमारे निम्मा असून, किनाऱ्यापासून साधारण सात किलोमीटरवर ती आहे. कुफोसचे कुलगुरू के. राजी जॉन म्हणाले की, “आणखी तपासानंतरच ती रचना ही वाळू किंवा खूप मोठा सलग भूप्रदेश (लँडमास) किंवा पाण्याखालील बेट आहे का हे उघड होईल.” स्थानिक मच्छीमारांनी हा प्रकार कोचीन बंदरात चिखल, गाळ काढण्याचा परिणाम असून, शक्यतो अशी शंका उपस्थित केली आहे. 

Web Title: An unknown island off the coast of Kerala? Many wonder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.