मोदींच्या नेतृत्वात भारत दोन्ही युद्ध जिंकतोय, अमित शहांनी ठणकावून सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:15 PM2020-06-28T13:15:41+5:302020-06-28T13:17:02+5:30

अमित शहांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, कोरोना आणि सीमारेषेवरील वादावरील प्रश्नांना उत्तरे दिली. लाईन ऑफ एक्च्युअल कंट्रोलवर भारत आणी चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे

Under Modi's leadership, India is winning both the wars, said Amit Shah | मोदींच्या नेतृत्वात भारत दोन्ही युद्ध जिंकतोय, अमित शहांनी ठणकावून सांगितलं

मोदींच्या नेतृत्वात भारत दोन्ही युद्ध जिंकतोय, अमित शहांनी ठणकावून सांगितलं

Next

नवी दिल्ली - देशाचे गृहमंत्री अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केल असून भारता दोन्ही लढाया जिंकत असल्याचे म्हटले. देशातील कोरोनाविरुद्धची लढाई भारताने अर्धी जिंकली असून कोरोनावर मात देण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत प्रभावी ठरला आहे. त्यामुळे, देशातील कोरोनाविरुद्धची लढाई आणि पूर्व लडाख सीमारेषेवरील सीमावादाच्या टेन्शनची लढाई, या दोन्ही लढाया भारत जिंकत असल्याचं अमित शहांनी ठणकावून सांगितलं आहे. 

अमित शहांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, कोरोना आणि सीमारेषेवरील वादावरील प्रश्नांना उत्तरे दिली. लाईन ऑफ एक्च्युअल कंट्रोलवर भारत आणी चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत ही लढाई जिंकत असल्याचं मला आधीच स्पष्ट करावे लागेल, असे अमित शहांनी म्हटले. तसेच, देशातील आणीबाणीवर बोलताना काँग्रेसवर हल्लाही चढवला. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून रोजी आणीबाणी जाहीर करुन देशातील लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचं काम केलंय. हा कुठल्याही पक्षावर नसून देशाच्या लोकशाहीवर केलेला हल्ला होता, असेही शहा यांनी म्हटले. 

चीनच्या मुद्द्यावरुन बोलताना, राहुल गांधी उथळ विचारांचे राजकारण करत आहेत, आम्ही ससंदेत प्रत्येक पश्चावर उत्तर देण्यास तयार आहोत. संसेदतील चर्चेसाठी सज्ज असल्याचे सांगितले. सरेंडर मोदी या हॅशटॅग ट्विटबद्दल बोलतानाही अमित शहांनी राहुल गांधींना लक्ष्य केले, काँग्रसचे हे ट्विट चीन आणि पाकिस्तानकडून प्रोत्साहित करण्यात आल्याचा आरोपही अमित शहांनी केला. 

दरम्यान, भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये जशासं तसं प्रत्युत्तर देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. भारत मैत्री निभावतो. मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणंदेखील आम्ही जाणतो, अशा शब्दांत त्यांनी चीनसोबतच्या वाढत्या तणावावर भाष्य केलं. शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आहे, नतमस्तक आहे, अशा शब्दांत मोदींनी वीरमरण पत्करलेल्या जवानांबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते 'मन की बात'मधून देशवासीयांशी संवाद साधत होते.


 

Web Title: Under Modi's leadership, India is winning both the wars, said Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.