EPFO: तुमच्या पीएफ खात्याला आधार नंबर जोडला का? EPFO ने मुदत वाढविली, जाणून घ्या प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:18 PM2021-06-16T13:18:24+5:302021-06-16T13:23:16+5:30

EPFO Aadhaar Card Link : ईपीएफओने कामगार मंत्रालयाची एक अधिसूचना जारी झाल्यानंतर आधार नंबर जोडणे अनिवार्य केले होते. यासंबंधी कामगार मंत्रालयाने ३ मे रोजी अधिसूचना जारी केली होती. 

UAN-Aadhaar linking to September 1; EPFO extends deadline, see process | EPFO: तुमच्या पीएफ खात्याला आधार नंबर जोडला का? EPFO ने मुदत वाढविली, जाणून घ्या प्रक्रिया

EPFO: तुमच्या पीएफ खात्याला आधार नंबर जोडला का? EPFO ने मुदत वाढविली, जाणून घ्या प्रक्रिया

googlenewsNext

EPFO ने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या Universal Account Number (UAN) ला आधार जोडण्याची मुदत वाढविली आहे. या आधी ही मुदत १ जून २०२१ ला संपली होती. या मुदतवाढीमुळे कंपन्यांना आणि पीएफ धारकांना आधार नंबर पीएफ खात्याशी जोडण्यास जादाचा वेळ मिळाला आहे. (link Aadhaar number to your PF account? EPFO deadline extended, learn the procedure)

ईपीएफओद्वारे जारी केलेल्या आदेशानुसार युएएनसोबत इलेक्ट्रीक चलन म्हणजेच पीएफ रिटर्नची रिसिट दाखल करण्याची वेळ १ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ईपीएफओने कामगार मंत्रालयाची एक अधिसूचना जारी झाल्यानंतर आधार नंबर जोडणे अनिवार्य केले होते. यासंबंधी कामगार मंत्रालयाने ३ मे रोजी अधिसूचना जारी केली होती. 

६ कोटींपेक्षा अधिक ईपीएफओ सदस्यांसाठी १ जूनपासून काही नियम बदलले आहेत. ईपीएफओनं सोशल सिक्युरिटी कोड २०२० अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. या नियमांतर्गत ज्या खातेधारकांनी आपल्या खात्याशी आधार कार्ड लिंक केलं नाही त्यांचं इलेक्ट्रॉनिक चालान कम रिटर्न म्हणजेच ECR भरता येणार नाही. या नियमाची मुदत वाढविण्यात आली आहे. यामुळे खातेधारकांना पीएफ खात्यात कंपनीकडून जो शेअर दिला जातो तो दोन महिने तरी मिळण्यात अडचणी येणार नाहीत. 

या नियमांतर्गत खातेधारकांचा यूएएनदेखील आधार व्हेरिफाईड असणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या. त्यानंतर युएएनदेखील व्हेरिफाय करून घ्या. यामुळे कंपनीकडून मिळणाऱ्या त्यांच्या शेअरमध्ये कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. जर यानुसार तुमचा आधार क्रमांक तुमच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्याशी जोडला न गेल्यास एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशनवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.


कसा कराल लिंक.... (EPFO Aadhaar Card Link)

  • आधार कार्ड लिंक करण्यासाठी सर्वप्रथम EPFO पोर्टल epfindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा.
  • 'Online Services' ऑप्शनमध्ये 'e-KYC portal' वर जा आणि Link UAN Aadhaar वर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुमचा UAN नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी आणि १२ अंकांचा Aadhaar Card क्रमांक त्या ठिकाणी टाका.
  • त्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्या आधार तपशीलासाठी आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या ईमेलसाठी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी जनरेट करा.
  • ईपीएफओ तुमच्या आधार क्रमांकाच्या लिंकींगसाठी ऑथेन्टिकेशनद्वारे तुमच्या कंपनीला संपर्क करेल.
  • त्यानंतर तुमचा रिक्रुटर ईपीएफ खात्याशी जोडण्यासाठी प्रक्रिया करेल त्यानंतर तुमचा आधार क्रमांक ईपीएफ खात्याशी जोडला जाईल.

Read in English

Web Title: UAN-Aadhaar linking to September 1; EPFO extends deadline, see process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.