छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:59 IST2025-06-11T19:47:43+5:302025-06-11T19:59:49+5:30
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन लक्षलवादी ठार झाले.

छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोहिम सुरू केली आहे. आज पुन्हा एकदा चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. कुकनार पोलीस ठाणे परिसरातील जंगलात मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून एक स्वयंचलित शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.
याबाबत सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे. ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
आज ११ जून २०२५ रोजी सकाळी, बंदी घातलेल्या सीपीआय माओवादी संघटनेच्या नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, कुकानार पोलिस ठाणे कर्मचारी आणि सुकमा डीआरजी यांचे संयुक्त पथक शोध मोहिमेसाठी रवाना झाले. ही शोध मोहीम दुपारी २ वाजता सुरू झाली, त्यादरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये अनेक वेळा गोळीबार झाला.
चकमकीच्या ठिकाणी हत्यार सापडली
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमधील एकाची ओळख पटली आहे. तो पेद्रास येथील स्थानिक संघटनेचा कमांडर आहे. त्याच्यावर ५ लाखांचे बक्षीस होते. महिला नक्षलवाद्याची ओळख अजूनही पटलेली नाही. या चकमकीनंतर सुरक्षा दलांना हत्यारे सापडली आहे. यामध्ये एक इन्सास रायफल, एक १२ बोर रायफल, तसेच इतर शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. अतिरिक्त सहाय्यक पथके तैनात करण्यात आली आहेत.
याआधी सुकमा जिल्ह्यात झालेल्या आयईडी स्फोटात अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे यांचा मृत्यू झाला होता. एएसपी गिरीपुंजे कोणत्याही गस्त घालत असताना कोंटा-एराबोरा रस्त्यावर दोंड्राजवळ आयईडी स्फोट झाला. यामध्ये सुकमा जिल्ह्यातील कोंटा विभागाचे एएसपी आकाश राव गिरीपुंजे गंभीर जखमी झाले.