सीमेवरील तणाव वाढवण्यासाठी चीनची 'ऑनलाइन खेळी', भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 07:57 AM2021-11-09T07:57:32+5:302021-11-09T07:58:46+5:30

China escalates border tension on Twitter : आता चीनकडून भारताविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुने व्हिडिओ शेअर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

Troops on high alert: China escalates border tension on Twitter | सीमेवरील तणाव वाढवण्यासाठी चीनची 'ऑनलाइन खेळी', भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

सीमेवरील तणाव वाढवण्यासाठी चीनची 'ऑनलाइन खेळी', भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

Next

नवी दिल्ली : सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, चीनला (China) सीमेवर तणावाची स्थिती कायम ठेवण्यास रस आहे. त्यामुळे चीनकडून वारंवार सीमेवरील वातावरण बिघडवणाऱ्या कारवाया करण्यात येत आहेत. आता चीनकडून भारताविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुने व्हिडिओ शेअर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

एवढेच नाही तर या मोहिमेद्वारे अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh)लष्करी कारवाईची धमकीही देण्यात आली आहे. भारतीय सीमेवर (Indian Border) पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (People’s Liberation Army)जवानांचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेक व्हेरिफाईड आणि अनव्हेरिफाईड अकाऊंटवरून शेअर केले जात आहेत.

'द इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, चीनमध्ये ट्विटरवर बंदी घालण्यात आली असली तरी, भारतीय सीमेवर तैनात असलेल्या पीएलए सैनिकांचे फोटो आणि माहितीने हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे भरून टाकण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे लडाख (Ladakh) आणि अरुणाचल या दोन्ही सीमेवर भारतीय अधिकारी हाय अलर्टवर आहेत. नुकत्याच पेंटागॉनच्या (Pentagon)अहवालात चीनबाबत अनेक खुलासे करण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अधिक सजग आहे.

पेंटागॉनच्या अहवालानंतर दोन दिवसांनी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे की, अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या सीमेवर चिनी सैन्य पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, अन्य एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनने पूर्व लडाखच्या सीमेवर त्यांचे लांब पल्ल्याचे रॉकेट तैनात केले आहे. तसेच, चिनी-समर्थित एका अकाऊंटच्या पोस्टमध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंगमध्ये चिनी सैनिक दाखविले आहेत. याशिवाय इतर अनेक प्रक्षोभक पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.

पेंटागॉनच्या अहवालानंतर सीमेवर अधिक दक्षता
दरम्यान, सोशल मीडियावर चिनी कृत्यांवर भारतीय अधिकारी आधीच लक्ष ठेवून असले तरी पेंटागॉनच्या अहवालानंतर त्याला वेग आला आहे. अरुणाचल सीमेवरील वादग्रस्त भागात चीनने 100 घरांचे गाव बांधले आहे, असेही अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे, भारताला सीमा वादावर शांततापूर्ण तोडगा हवा आहे आणि तो सातत्याने प्रयत्न करत आहे, पण चीन आपल्या कारवायांना आवर घालत नाही.
 

Web Title: Troops on high alert: China escalates border tension on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.