VIDEO: ओवेसींना पूनम महाजनांची टक्कर, महिला सन्मानावर बोलल्या 'कट्टर'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 08:43 PM2019-07-25T20:43:37+5:302019-07-25T20:53:39+5:30

पूनम महाजनांचं ओवेसींना जोरदार प्रत्युत्तर

triple talaq bill bjp mp poonam mahajan gives befitting reply to mim chief asaduddin owaisi | VIDEO: ओवेसींना पूनम महाजनांची टक्कर, महिला सन्मानावर बोलल्या 'कट्टर'

VIDEO: ओवेसींना पूनम महाजनांची टक्कर, महिला सन्मानावर बोलल्या 'कट्टर'

Next

नवी दिल्ली: तिहेरी तलाक विधेयकावरील चर्चेदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनीभाजपावर आणि मोदी सरकारवर टीका केली. ओवेसींच्या टीकेला भाजपाकडून खासदार पूनम महाजन यांनी उत्तर दिलं. तुमच्या कुटुंबातील एखाद्या महिलेला तिच्या पतीनं फोनवरुन तलाक दिला, तर त्याचं अभिनंदन कराल का, असा सवाल महाजन यांनी विचारला.

तिहेरी तलाक विधेयक व्हॉट्स अ‍ॅप, फोन कॉलवरुन तलाक देणाऱ्यांविरोधात आहे. कारण जेवणात मीठ कमी पडलं म्हणूनही तलाक देणाऱ्या महिलांच्या व्यथा आम्ही जाणून आहोत, असं महाजन म्हणाल्या. इंग्रजीत पुरुषाला he आणि महिलेला she म्हणतात. त्या she चा अर्थ सुपीरियर टू ही (Superior to he) असा होता. तिहेरी तलाकविरोधातील याचिकेवर १० लाख महिलांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांना आपण वाऱ्यावर सोडू शकत नाही. हा आमचा न्यायासाठीचा लढा असून आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही', अशा शब्दांत महाजन यांनी ओवेसींनी प्रत्युत्तर दिलं. 



महाजन यांच्याआधी असदुद्दीन ओवेसींनी तिहेरी तलाक विधेयकावरुन सरकारला लक्ष्य केलं. या विधेयकात तलाक देणाऱ्या व्यक्तीस 3 वर्षांची शिक्षा आणि दंडांची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षा झाल्यानंतर तुरुंगात असलेला पती आपल्या पत्नीला पैसे कसे काय देणार? असा प्रश्न औवेसी यांनी विचारला. सरकारकडून लग्न प्रथाच नष्ट करण्यात येत आहे. सरकार महिलेला रस्त्यावर आणि तिच्या पतीला तुरुंगात टाकत आहे. मुस्लीमांना त्यांच्या सभ्यता आणि शिष्टाचारापासून दूर करण्याचा हा डाव आहे. इस्लाम धर्मात लग्न हे जन्मोजन्मीचं नातं नसून केवळ एक कॉन्ट्रॅक्ट आहे, असं औवेसी यांनी म्हटलं. हे विधेयक संविधानविरोधी असून यामध्ये तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. न्यायालयाने समलैंगिकता गुन्हा नसल्याचं म्हटलंय, मग ट्रिपल तलाक गुन्हा कसा? असा प्रश्नही ओवेसींनी उपस्थित केला.  

Web Title: triple talaq bill bjp mp poonam mahajan gives befitting reply to mim chief asaduddin owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.