दक्षिण बंगालमध्ये तृणमूलची जोरदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:49 AM2021-05-07T06:49:29+5:302021-05-07T06:50:05+5:30

१३७ जागा जिंकत विरोधकांवर केली मात

Trinamool's strong performance in South Bengal | दक्षिण बंगालमध्ये तृणमूलची जोरदार कामगिरी

दक्षिण बंगालमध्ये तृणमूलची जोरदार कामगिरी

Next

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसला जबरदस्त यश मिळाले आहे. तृणमूलच्या जागांमध्ये वाढ झाली असून राज्यातील सर्वच भागांमध्ये तृणमूलने चांगली कामगिरी केली. विशेषतः दक्षिण बंगाल व रार बंगाल या भागात तृणमूलला मतदारांची पसंती राहिली. तर जंगलमहल व उत्तर बंगालमध्ये भाजपला चांगल्या जागा मिळाल्या.

जंगलमहल – झारखंड व बिहारच्या सीमांना लागून असलेल्या ४० मतदारसंघांच्या या भागात एकेकाळी डाव्या पक्षांचे व मागील दहा वर्षांपासून तृणमूलचे वर्चस्व होते. सहा जिल्ह्यांत बांकुरा, पुरुलिया, पश्चिम मेदिनीपूर व झारग्राम या जिल्ह्यांचा समावेश होतो. येथे भाजपला १३ जागा मिळविण्यात यश आले. तर तृणमूलला २७ जागा मिळाल्या.

उत्तर बंगाल – कूचबिहार, मालदा यासह आदिवासीबहुल जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर बंगालमध्ये ५४ मतदारसंघ येतात. २०१८ च्या पंचायत समिती निवडणूक व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या भागात भाजपने चांगली कामगिरी केली होती. या भागावर भाजपने शक्ती पणाला लावली होती. मात्र, लोकसभेसारखी कामगिरी करता आली नाही. भाजपला ३०, तृणमूलला २३ जागा मिळाल्या.

दक्षिण बंगाल – कोलकाता, दक्षिण व उत्तर २४ परगणा, हावडा, हुबळी या जिल्ह्यांतील १६२ मतदारसंघांतील जागांवर तृणमूलची मदार होती. अपेक्षेप्रमाणे तृणमूलने तेथे चांगली कागिरी केली व १३७ जागांवर विजय मिळविला. भाजपला २५ जागांवरच यश मिळाले.

विभागनिहाय पक्षांना मिळालेल्या जागा

भाग    तृणमूल    भाजप    इतर
उत्तर बंगाल    २३    ३०    १
रार बंगाल    २८    ८    ०
दक्षिण बंगाल    १३७    २५    ०
जंगलमहल    २७    १३    ०  

n    रार बंगाल – या भागात ३७ जागांचा समावेश होता व भाजपने येथे बरेच प्रयत्न केले होते.
n    मात्र, त्यांना ८ जागांवर समाधान मानावे लागले तर तृणमूलला २८ जागांवर यश मिळाले.

Web Title: Trinamool's strong performance in South Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.