"हे असं गुजरात असेल तर आम्हाला..."; सरकारी रुग्णालयातील 'तो' Video शेअर करत तृणमूलचा मोदी, शहांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 06:25 PM2021-04-08T18:25:52+5:302021-04-08T18:32:27+5:30

Trinamool Congress Slams Narendra Modi And Amit Shah Over Gujarat : तृणमूल काँग्रेसने थेट गुजरातमधील परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

trinamool congress share video of govt hospital in bhavnagar gujarat and slams bjp narendra modi | "हे असं गुजरात असेल तर आम्हाला..."; सरकारी रुग्णालयातील 'तो' Video शेअर करत तृणमूलचा मोदी, शहांवर निशाणा

"हे असं गुजरात असेल तर आम्हाला..."; सरकारी रुग्णालयातील 'तो' Video शेअर करत तृणमूलचा मोदी, शहांवर निशाणा

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) थेट गुजरातमधील परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तृणमूल काँग्रेसनेगुजरातमधील (Gujarat ) एका सरकारी रुग्णालयातील भीषण परिस्थिती दाखवणारा व्हिडीओ शेअर करत जोरदार निशाणा साधला आहे. 

तृणमूल काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. "या धक्कादायक व्हिडीओमध्ये रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास होताना दिसत आहे. गुजरातच्या भावनगरमधील सरकारी रुग्णालयामध्ये रुग्ण जमिनीवर पडून आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्री बंगालमध्ये खोटी आश्वासनं देत असतानाच हा व्हिडीओ समोर आला आहे. जर हे सोनार गुजरात असेल तर आम्हाला माफ करा आम्हाला सोनार बांगला नकोय" असं म्हटलं आहे. 

भावनगरमधील कोरोना सरकारी रुग्णालयातील हा व्हिडीओ असल्याचं व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती गुजराती भाषेत सांगताना ऐकायला येत आहे. तसेच व्हिडीओमध्ये काहीजण स्ट्रेचरवर तर काहीजण जमिनीवर चादर टाकून ऑक्सिजन सिलेंडरच्या बाजूला पडून श्वास घेताना दिसत आहेत. अनेकजण बाहेर उभे आहेत. रुग्णालयाच रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचं देखील व्हिडीओमध्ये सांगण्यात येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

कोरोना संकटातील धक्कादायक वास्तव! कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला होतोय व्हेंटिलेटरचा पुरवठा

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला व्हेंटिलेटरचा पुरवठा होत असल्याची माहिती आता मिळत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच गुजरातमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान हा भयंकर प्रकार समोर आला आहे. सूरतमध्ये चक्क कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून रुग्णालयात व्हेंटिलेटर नेण्यात आले आहेत. व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याने 34 व्हेंटिलेटर ट्रकमधून नेण्यात आले. गुजरातमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन सरकारने रुग्णालयांमध्ये तुटवडा भासू लागल्याने गुजरात सरकारने वलसाड येथून सूरतला 34 व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचा आदेश दिला होता. सरकारच्या आदेशानंतर सूरत महापालिकेने व्हेंटिलेटर आणण्यासाठी वलसाडला कचऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पाठवला होता. 

Web Title: trinamool congress share video of govt hospital in bhavnagar gujarat and slams bjp narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.