सोनप्रयाग ते केदारनाथचा प्रवास एका तासात; जगातील सर्वांत लांब रोपवेसाठी लागणार ११०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 08:07 AM2022-05-17T08:07:58+5:302022-05-17T08:08:33+5:30

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने जगातील सर्वांत लांब आणि उंच रोप वेसाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनविला आहे.

travel from sonprayag to kedarnath in one hour world longest ropeway will cost rs 1100 crore | सोनप्रयाग ते केदारनाथचा प्रवास एका तासात; जगातील सर्वांत लांब रोपवेसाठी लागणार ११०० कोटी

सोनप्रयाग ते केदारनाथचा प्रवास एका तासात; जगातील सर्वांत लांब रोपवेसाठी लागणार ११०० कोटी

Next

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली: सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंतचा २१ कि.मी.चा प्रवास रोप वेच्या माध्यमातून होणार आहे. हा प्रवास केवळ एका तासाच्या आत पूर्ण करता येणार आहे. सध्या हा प्रवास पायी किंवा घोड्यावर करावा लागतो. त्यासाठी १० ते १६ तास लागतात. 

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने जगातील सर्वांत लांब आणि उंच रोप वेसाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) बनविला आहे. उत्तराखंड सरकारकडून या प्रोजेक्टसाठी भूमी संपादनाचे काम सुरू झाले आहे. हे काम मंत्रालयाच्या नॅशनल हायवे ॲथॉरिटी इंडिया (एनएचएआय) आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडकडून (एनएचएलएमएल) संयुक्तपणे करण्यात येत आहे. १३ किमीच्या या रोप वेसाठी ११०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा रोप वे समुद्रसपाटीपासून ११५०० फूट उंच बनणार आहे.

हेमकुंड साहिबसाठीही रोप वे 

एनएचएलएमएल उत्तराखंडमध्ये अनेक रोप वे बनविण्याची तयारी करीत आहे. यातील दुसरा प्रमुख रोप वे हा गोविंदघाट ते घनघरियामार्गे शिखांचे प्रमुख तीर्थस्थळ हेमकुंड साहिबपर्यंत असणार आहे. याशिवाय नैनीतालमध्ये रानी बाग ते हनुमान मंदिरपर्यंत न्यू टेहरीमध्ये पंचकोट ते बमरोडपर्यंत, पिथौरागढमध्ये मुंसियारी ते खलिया टॉप, डेहराडून जिल्ह्यात ऋषिकेश ते नीलकंठ आणि चमोली जिल्ह्यात ऑली ते गोरसूंपर्यंत रोप वे बनविण्याचा प्रस्ताव एनएचएलएमएलला देण्यात आला आहे.

Web Title: travel from sonprayag to kedarnath in one hour world longest ropeway will cost rs 1100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.