नरोदा पाटिया दंगल प्रकरणात आज निर्णय, माया कोडनानी, बाबू बजरंगीसह 32 दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:20 AM2018-04-20T10:20:01+5:302018-04-20T10:20:19+5:30

2002मधलं बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयानं भाजपा आमदार माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 32 जणांना दोषी ठरवलं आहे.

Today's judgment in Naroda Patiya riots case, 32 guilty including Maya Kodnani, Babu Bajrangi | नरोदा पाटिया दंगल प्रकरणात आज निर्णय, माया कोडनानी, बाबू बजरंगीसह 32 दोषी

नरोदा पाटिया दंगल प्रकरणात आज निर्णय, माया कोडनानी, बाबू बजरंगीसह 32 दोषी

अहमदबाद- 2002मधलं बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयानं भाजपा आमदार माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 32 जणांना दोषी ठरवलं आहे. याच प्रकरणावर गुजरात उच्च न्यायालय आज सुनावणी होणार आहे. 16 वर्षांपूर्वी 28 फेब्रुवारी 2002मध्ये अहमदबादेतल्या नरोदा पाटिया भागात सर्वात मोठी दंगल उसळली होती. 27 फेब्रुवारी 2002ला गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी जाळल्यानंतर दुस-या दिवशी गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत नरोदा पाटिया भागात मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला होता. गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत नरोदा पाटिया येथे 97 लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यात 33 लोक जखमी झाले होते.

गुजरातमधल्या दंगलीचा सर्वाधिक फटका हा नरोदा पाटिया भागाला बसला होता. 2002मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमध्येही नरोदा पाटिया येथील दंगल विशेष गाजली होती. या दंगलीत 97 जणांना ठार करण्यात आलं होतं. माया कोडनानी यांना या प्रकरणात 28 वर्षांची शिक्षा झाली होती. दंगल उसळली त्या वेळी माया कोडनानी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. त्या या दंगलीच्या सूत्रधार होत्या, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता.

नरोदा गावात झालेल्या दंगलीतील सहभागाबद्दल विशेष कोर्टात खटला सुरू होता, बचाव साक्षीदार म्हणून अमित शहा यांचं नाव आलं होतं. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना माया कोडनानी मंत्री होत्या. नरोदा येथे जेव्हा दंगल झाली, तेव्हा आपण अमित शहा यांच्यासमवेत रुग्णालयात गेलो होतो, त्यामुळे आपला दंगलीत सहभाग नाही, असा दावा माया कोडनानी यांनी कोर्टात केला होता.

Web Title: Today's judgment in Naroda Patiya riots case, 32 guilty including Maya Kodnani, Babu Bajrangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.