पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, तिन्ही जागा तृणमूलकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 04:48 AM2019-11-29T04:48:37+5:302019-11-29T04:49:22+5:30

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या ३ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांत तृणमूल काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे.

TMC Win Three seats in West Bengal | पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, तिन्ही जागा तृणमूलकडे

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, तिन्ही जागा तृणमूलकडे

Next

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या ३ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांत तृणमूल काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे. भाजपची अहंकारी वृत्ती व त्या पक्षाने एनआरसीचा धरलेला आग्रह या विरोधात जनतेने हा कौल दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.

कालियागंज विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तपन देब सिन्हा यांनी निकटचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे उमेदवार कमलचंद्र सरकार यांचा २४१८ मतांनी पराभव केला. खरगपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार प्रदीप सरकार यांनी भाजपच्या प्रेमचंद झा यांचा २०,८११ मतांनी, तर करीमपूर विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या बिमलेंदू सिन्हा रॉय यांनी भाजपच्या जयप्रकाश मजुमदार यांचा २३,६५० मतांनी पराभव केला.

ममता यांनी म्हटले आहे की, विधानसभेच्या तीन जागांसाठीच्या पोटनिवडणुकांत तृणमूल काँग्रेसला मिळालेला विजय आम्ही जनतेच्या चरणी अर्पण करतो.

Web Title: TMC Win Three seats in West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.