TMC चे वरिष्ठ नेते सुब्रत मुखर्जी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; ममता म्हणाल्या - मोठी हानी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 11:31 PM2021-11-04T23:31:36+5:302021-11-04T23:33:12+5:30

सुब्रत मुखर्जी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर, त्यांना कोलकात्यातील SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पश्चिम बंगालच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतःच रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांनीच आपल्या सहकारी नेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली.

TMC leader Subrata Mukherjee passes away due to heart attack kolkata hospital mamata Banerjee | TMC चे वरिष्ठ नेते सुब्रत मुखर्जी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; ममता म्हणाल्या - मोठी हानी

TMC चे वरिष्ठ नेते सुब्रत मुखर्जी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; ममता म्हणाल्या - मोठी हानी

Next

कोलकाता - पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुब्रत मुखर्जी यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते.

सुब्रत मुखर्जी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर, त्यांना कोलकात्यातील SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पश्चिम बंगालच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतःच रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांनीच आपल्या सहकारी नेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली. सुब्रत मुखर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पंचायत राज विभागाचे मंत्री होते.

एसएसकेएम रुग्णालयात पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, की त्यांनी आयुष्यात अनेक मोठी संकटं पाहिली आहेत. मात्र, ही खूप मोठी हानी आहे. तसेच, सुब्रत मुखर्जी यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती मला रुग्णालयाकडून मिळाली होती, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक नेत्यांनी सुब्रत मुखर्जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात सुब्रत मुखर्जी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्रत मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारनाही होत होती. एवढेच नाही, तर त्यांना रुग्णालयातून डिस्चारजदेखील दिला जाणार होता. मात्र, तसे होऊ शकले नाही.
 

Web Title: TMC leader Subrata Mukherjee passes away due to heart attack kolkata hospital mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.