अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 05:02 PM2019-09-05T17:02:34+5:302019-09-05T17:04:35+5:30

गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

A three-storey building collapses in Amraiwadi area in Ahmedabad | अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू 

अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देगुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (5 सप्टेंबर) दुपारी एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या अमरायवाडी परिसरात तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य वेगाने सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले असण्याची शक्यता असल्याने ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याआधी काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे सीलमपूर परिसरात चार मजली इमारत कोसळली होती. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते. 


 

Web Title: A three-storey building collapses in Amraiwadi area in Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.