अपंग पतीसमोरच महिलेवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, तीन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:56 PM2019-08-12T17:56:51+5:302019-08-12T17:57:01+5:30

आसाममधल्या डिब्रुगडमध्ये बोकपारा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

three people arrested raping woman in front of her husband in assam | अपंग पतीसमोरच महिलेवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, तीन जणांना अटक

अपंग पतीसमोरच महिलेवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, तीन जणांना अटक

Next

दिसपूरः आसाममधल्या डिब्रुगडमध्ये बोकपारा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका दिव्यांग पतीसमोरच तिच्या पत्नीवर तिघांनी आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकारानंतर परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुपारच्या सुमारास गावात जास्त रहदारी नसल्याचा फायदा घेत हे तीन आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्यानं त्या महिलेच्या घरात घुसले आणि संधी साधत त्यांनी महिलेवर आळीपाळीनं बलात्कार केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, 40 वर्षीय महिला घरात झोपलेली होती. तिन्ही आरोपींनी पाणी मागण्याच्या बहाण्यानं महिलेचा दरवाजा ठोठावला. जेव्हा तिनं दरवाजा उघडण्यास नकार दिला, त्यावेळी दरवाजा तोडून ते आत घुसले. त्यानंतर पतीसमोरच त्या तिघा नराधमांनी महिलेवर अमानुष अत्याचार केला. त्या महिलेचं घर हे गावातल्या शेवटच्या कोपऱ्यात आहे. त्यामुळे कोणीही तिच्या मदतीला धावून आलं नाही. त्यानंतर महिलेनं पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केलं. पोलिसांनी कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. 
 

Web Title: three people arrested raping woman in front of her husband in assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.