धक्कादायक! Remdesivir चा मोठा तुटवडा असताना कालव्यामध्ये आढळले हजारो इंजेक्शन; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:49 PM2021-05-07T12:49:50+5:302021-05-07T13:02:47+5:30

Thousands Of Remdesivir Found In Canal : कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

thousands of Remdesivir found in canal vaccines have written for government supply not for sale | धक्कादायक! Remdesivir चा मोठा तुटवडा असताना कालव्यामध्ये आढळले हजारो इंजेक्शन; घटनेने खळबळ

धक्कादायक! Remdesivir चा मोठा तुटवडा असताना कालव्यामध्ये आढळले हजारो इंजेक्शन; घटनेने खळबळ

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशातच एक भयंकर घटना समोर आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा असताना हजारो रेमडेसिवीर इंजेक्शन कालव्यामध्ये आढळून आले आहेत. यात रेमडेसिवीर आणि चेस्ट इन्फेक्शनच्या (Chest Infection) इंजेक्शनचा समावेश आहे. यामध्ये सरकारला पुरवठा केले जाणारे 1456 इंजेक्शन, 621 रेमडेसिवीर इंजेक्शन आणि 849 विना लेबल इंजेक्शनचा देखील समावेश आहे.

एका वृत्तपत्रानं दिलेल्या रिपोर्टनुसार, रेमडेसिवीर इंजेक्शनवर किंमत 5400 रुपये लिहिण्यात आलेली असून निर्मितीची तारीख मार्च 2021 तर अंतिम तारीख नोव्हेंबर 2021 लिहिण्यात आलेली आहे. सेफोपेराजोन इंजेक्शनवर निर्मितीची तारीख एप्रिल 2021 आणि एक्सपायरी डेट मार्च 2023 लिहिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या इंजेक्शनवर विक्रीसाठी नाही, केवळ सरकारी पुरवठा असंही लिहिलं आहे. ही घटना पंजाबच्या चमकौर साहिबजवळील भाखरा कालव्यामधील आहे. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे, इतक्या मोठ्या संख्येने इंजेक्शन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यात ऑक्सिजन, लस आणि औषधांसोबतच व्हेंटिलेटरचाही मोठा तुटवडा आहे. कारण भारत सरकारकडून देण्यात आलेल्या 809 व्हेंटिलेटरपैकी 108 व्हेंटिलेटर स्थापित करण्यासाठी कोणीही इंजिनिअर नाही. त्यांनी मागील महिन्यांपासून याबाबत केंद्राला अनेकदा पत्र लिहिलं आहे. अशातच आता कालव्यामध्ये या अत्यावश्यक इंजेक्शन एवढा मोठा साठा आढळणं सरकारचा हलगर्जीपणाच दर्शवत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका; 'या' शहरात आढळले रुग्ण

 कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीत ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनामुळे "म्यूकोरमायसिस" प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. म्यूकोरमायसिस हे कोरोनामुळे होणारं एक फंगल संक्रमण आहे. यामध्ये डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मुंजाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला कोरोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आलं होतं. तसेच नाक आणी गळ्याचं हाड गळून गेलं होतं."

Web Title: thousands of Remdesivir found in canal vaccines have written for government supply not for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.