हे दोन काश्मिरी अधिकारी हाणून पाडताहेत पाकिस्तानचा सोशल मीडियावरचा खोटारडेपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 01:09 PM2019-08-18T13:09:16+5:302019-08-18T13:10:16+5:30

काश्मीरमधून 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान नवनवीन कुरापत्या करत आहे. पाकिस्तानकडून साेशल मीडियावर खाेटी माहिती पसरवली जात आहे. त्याला भारतीय अधिकारी चाेख प्रत्युत्तर देत आहेत.

These two Kashmiri officials are accusing Pakistan of being a liar on social media | हे दोन काश्मिरी अधिकारी हाणून पाडताहेत पाकिस्तानचा सोशल मीडियावरचा खोटारडेपणा

हे दोन काश्मिरी अधिकारी हाणून पाडताहेत पाकिस्तानचा सोशल मीडियावरचा खोटारडेपणा

Next

श्रीनगर : काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 अ हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सरकारने केलेली पूर्वतयारी आणि चोख बंदोबस्तामुळे काश्मीरमध्ये अशांतता माजवण्याचे फुटीरतावादी आणि पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यामुळे आता काश्मिरी जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडूनसोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली जात आहे. मात्र येथेही पाकिस्तानच्या खोटारडेपणाला दोन काश्मिरी अधिकारी चोख प्रत्युत्तर देत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करणारे श्रीनगर येथे तैनात असलेले आयपीएस अधिकारी इम्तियाज हुसेन सबळ पुरावे आणि तर्कांच्या आधारावर पाकिस्तानच्या खोटेपणाला सोशल मीडियावर उघडे पाडत आहेत. तसेच आपल्या तिखट प्रत्युत्तराद्वारे पाकिस्तानी ट्रोलर्सवर जोरदार पलटवार करत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्य दिनीकाळा दिवस पाळण्याच्या इम्रान खानच्या आवाहनाचीही हुसेन यांनी खिल्ली उडवली आहे. "सर्वप्रकारची आक्रामकता, दहशतवाद आणि भडकवण्याचे प्रयत्न इतके करूनही पाकिस्तानी सरकार काश्मीर बळकावू शकत नाही. आता टविटरवरून असे प्रयत्न करत असतील तर त्यांना ते करू द्या असा टोला इम्तियाज हुसेन यांनी लगावला आहे.

काश्मीरमधील अन्य एक आयएएस अधिकारी शाहीद चौधरीसुद्धा पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पाडत आहेत. "काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडलेली असून, लोकांना ठार मारले जात असल्याचा खोटारडा दावा  पाकिस्तानकडून जगभरात करण्यात येत आहे. मात्रा शाहीद चौधरी वस्तुस्थिती आणि प्रत्यक्ष चित्रफितींच्या माध्यमातून काश्मीरमधील शांत परिस्थिती जगाला दाखवत आहेत. तसेच चौधरी हे सातत्याने टविट करून श्रीनगरमधील परिस्थितीची ताजी माहिती देत आहेत. तसेच अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतही करत आहेत. 

यादरम्यान, काश्मीरमधील रुग्णालयातील फोन बंद असल्याचा एका विदेशी पत्रकाराने केलेला दावा पुराव्यानिशी खोडून काढला असून, अफवा न पसरवण्याचा सल्ला संबंधित पत्रकाराला दिला आहे.

Web Title: These two Kashmiri officials are accusing Pakistan of being a liar on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.