...तर Congressला लोकसभेत मिळू शकते विरोधी पक्षनेते पद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 06:53 AM2021-10-10T06:53:11+5:302021-10-10T06:53:42+5:30

Congress Politics: लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या १० टक्के म्हणजे ५५ जागा असलेल्या पक्षास नियमानुसार विरोधी पक्षनेते पद मिळते. काँग्रेसला त्यासाठी तीन जागा कमी पडतात. त्यामुळे काँग्रेस मागील सात वर्षांपासून विरोधी पक्षनेते पदापासून दूर आहे. 

... then Congress can get the post of Leader of the Opposition in the Lok Sabha | ...तर Congressला लोकसभेत मिळू शकते विरोधी पक्षनेते पद

...तर Congressला लोकसभेत मिळू शकते विरोधी पक्षनेते पद

googlenewsNext

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : या महिनाअखेरीस दादरा-नगर हवेली, मंडी (हिमाचल प्रदेश) आणि खंडवा (मध्य प्रदेश) या तीन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून या तिन्ही जागा काँग्रेसने जिंकल्यास पक्षाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद मिळू शकते.
लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या १० टक्के म्हणजे ५५ जागा असलेल्या पक्षास नियमानुसार विरोधी पक्षनेते पद मिळते. काँग्रेसला त्यासाठी तीन जागा कमी पडतात. त्यामुळे काँग्रेस मागील सात वर्षांपासून विरोधी पक्षनेते पदापासून दूर आहे.

जिंकण्याची खात्री
- दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन दरेकर यांनी आत्महत्या केली असून मंडी व खंडवा येथील खासदारांचा मृत्यू झाला
आहे. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. दादरा-नगर हवेली आणि मंडी या जागा जिंकण्याची काँग्रेसला खात्री वाटते. 
-   दादरा-नगर हवेलीचे ७ वेळा खासदार राहिलेले  दरेकर हे सहा वेळा काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते, तसेच मंडी हा स्व. वीरभद्रसिंग यांचा बालेकिल्ला असून त्यांच्या पत्नीलाच काँग्रेसने आता उमेदवारी दिली आहे.

 

Web Title: ... then Congress can get the post of Leader of the Opposition in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.