सलमान खानला तात्पुरता दिलासा

By admin | Published: February 26, 2015 12:08 AM2015-02-26T00:08:48+5:302015-02-26T00:08:48+5:30

सन १९९८ मध्ये दोन काळविटांची अवैध शिकार करताना विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी बॉलीवूड स्टार सलमान खान याला येथील न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला

Temporary Resolve to Salman Khan | सलमान खानला तात्पुरता दिलासा

सलमान खानला तात्पुरता दिलासा

Next

जोधपूर : सन १९९८ मध्ये दोन काळविटांची अवैध शिकार करताना विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी बॉलीवूड स्टार सलमान खान याला येथील न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे़ जोधपूर न्यायालय बुधवारी याप्रकरणी आपला अंतिम निकाल सुनावणार होते; मात्र या प्रकरणाबाबत ४ याचिका प्रलंबित असल्याचे लक्षात आल्यानंतर खटल्याची सुनावणी ३ मार्चपर्यंत लांबणीवर टाकली़
याप्रकरणी सन २००६ मध्ये दाखल केलेले अर्ज अद्याप प्रलंबित असल्याचे गत १० फेबु्रवारीला या खटल्याच्या अंतिम सुनावणीवेळी सलमानच्या वकिलाने न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते़ प्रकरणाशी संबंधित जुन्या याचिका निकाली निघाल्याशिवाय मूळ खटल्याबाबत निकाल सुनावता येणार नाही, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले होते़
दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी सलमानने हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते; मात्र सुनावणी सुरू होताच सलमानची प्रकृती बरी नसल्याचे सांगून त्याच्या वकिलाने त्याला प्रत्यक्ष पेशीतून सवलत देण्याची विनंती करणारा अर्ज केला़ हा अर्ज मान्य केला़ (वृत्तसंस्था)

Web Title: Temporary Resolve to Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.