Valentines Day : संघाने धमकावल्यास 'कामदेव दिवस' साजरा करतोय म्हणून सांगा - थरूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:01 PM2019-02-14T15:01:23+5:302019-02-14T15:06:44+5:30

Valentines Day : जगभरात आज 'व्हॅलेंटाईन डे' जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी हिंदुत्ववादी संघटनांना टोला हाणला आहे.

Tell Them it's Kamadeva Diwas': Shashi Tharoor's Advice to Avoid 'Sangh' Trouble on Valentine's Day | Valentines Day : संघाने धमकावल्यास 'कामदेव दिवस' साजरा करतोय म्हणून सांगा - थरूर

Valentines Day : संघाने धमकावल्यास 'कामदेव दिवस' साजरा करतोय म्हणून सांगा - थरूर

Next
ठळक मुद्देहिंदुत्ववादी संघटना अडवल्यास कामदेव दिवस साजरा करतोय म्हणून सांगा - शशी थरूरथरूरू लव्ह गुरू - मुख्तार अब्बास नक्वींची टीका

नवी दिल्ली -  'व्हॅलेंटाईन डे' साजरा करणाऱ्यावरुन काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी हिंदुत्ववादी संघटनांना टोला हाणला आहे. ट्विट करत थरूर यांनी संघ परिवारावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. थरूर यांनी 'व्हॅलेंटाईन डे'ला कामदिवस म्हटले आहे.  गुरुवारी(14 फेब्रुवारी) थरूर यांनी ट्वीट केले की, 'व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!, जर संघ परिवाराने तुम्हाला ट्रोल केल्यास किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरण्याबाबत अडवले किंवा धमकी देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना सांगा तुम्ही प्राचीन भारतीय परंपरेचा 'कामदेव दिवस' साजरा करत आहात'. या ट्विटसोबत थरूर यांनी राधा-कृष्णाची प्रतिमा असलेली एक लिंकदेखील शेअर केली आहे.   

दुसरीकडे, थरूर यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत भाजपानं त्यांच्यावर टीका केली आहे.  थरूर लव्ह गुरू आहेत, असा चिमटा काढत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीकास्त्र सोडले



'शशी थरूर लव्ह गुरू आहेत. आता कोणीही 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यास विरोध केला तर त्यांच्या मदतीसाठी लव्ह गुरू मैदानात उतरतील', अशी प्रतिक्रिया नक्वी यांनी दिली आहे. 

 

Web Title: Tell Them it's Kamadeva Diwas': Shashi Tharoor's Advice to Avoid 'Sangh' Trouble on Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.