पंतप्रधानांविरोधात तेजबहाद्दूरने ठोकले शड्डू; वाराणसीत घरोघरी प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 11:55 AM2019-04-25T11:55:00+5:302019-04-25T11:56:41+5:30

जिल्हा निवडणूक कार्यालयानुसार तिसऱ्या दिवशी तेजबहाद्दूर यांनी अर्ज दाखल केला.

Tejbahadur nomination against PM Narendra Modi in Varanasi | पंतप्रधानांविरोधात तेजबहाद्दूरने ठोकले शड्डू; वाराणसीत घरोघरी प्रचार

पंतप्रधानांविरोधात तेजबहाद्दूरने ठोकले शड्डू; वाराणसीत घरोघरी प्रचार

Next

वाराणसी : सैन्यदलातील दर्जाहीन जेवणावर आवाज उठवल्याने बडतर्फ केलेले बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शड्डू ठोकले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींविरोधात वाराणसी मतदारसंघातून बुधवारी अर्ज दाखल केला असून घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. 


जिल्हा निवडणूक कार्यालयानुसार तिसऱ्या दिवशी तेजबहाद्दूर यांनी अर्ज दाखल केला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत.  तेजबहाद्दूर हे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. त्यांच्यासोबत 2500 जवान असल्याचा दावाही केला आहे. 


2017 मध्ये तेज बहाद्दूर यादव यांनी बीएसएफमध्ये दर्जाहीन जेवण देत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत सैन्य दलातील भ्रष्टाचार उघड केला होता. यावेळी ते भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. मंडी मंदिर मुख्यालयातील 29 व्या बटालियनमध्ये ते कॉन्टेबल या पदावर होते. त्यांची नियुक्ती पूंछ जिल्ह्यातील खेत येथील एलओसीवर झाली होती. 

 

हे प्रकरण खूप गाजले होते. गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं. बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपला छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर, तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची आणखीही काही प्रकरणं समोर आली होती.

बहाद्दूर यांच्याकडे दोन मोबाईल बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच सैन्याच्या गणवेशात असताना सोशल मिडियावर फोटो टाकल्याने  सैन्याचे नियम तोडल्याचा आरोप ठेवत त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. 
 

Web Title: Tejbahadur nomination against PM Narendra Modi in Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.