sweeper raped five year old kid in toilet of school in delhi | धक्कादायक! शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याचा 5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
धक्कादायक! शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याचा 5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

नवी दिल्लीः दक्षिण दिल्लीतल्या जीके-2 क्षेत्रात एका खासगी शाळेत पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्यानंच हे दुष्कृत्य केलं आहे. 45 वर्षांच्या पीचा मुथ्थू या नराधमानं हे कृत्य केलं असून, तो कालकाजी सुधार कॅम्पमध्ये राहतो. पोलिसांच्या माहितीनुसार, आठ ऑगस्ट रोजी हे प्रकरण उघडकीस आलं. मुलीबरोबर त्या सफाई कर्मचाऱ्यानं शौचालयात दुष्कृत्य केल्याचं सांगितल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, एम्समध्ये पीडित मुलीची तपासणी झाली असून, आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानं शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शौचालयात तो नराधम चिमुकल्या मुलींशी कशा प्रकारे अमानुष अत्याचार करायचा हे सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. 

गेल्या 20 वर्षांपासून तो शाळेत कार्यरत आहे. त्याला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली होती. मुलीनंही आरोपीची ओळख पटवली होती. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर आणि सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आलं आहे. 

Web Title: sweeper raped five year old kid in toilet of school in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.