PM मोदींना दंडवत प्रणाम, पद्म पुरस्कार घेण्यासाठी पोहोचलेल्या 126 वर्षीय स्वामी शिवानंद यांचा VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 09:54 PM2022-03-21T21:54:52+5:302022-03-21T21:57:55+5:30

स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धती आणि योग क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Swami Sivananda receives padma shri award for his contribution in the field of yoga PM Narendra Modi president Ramnath kovind | PM मोदींना दंडवत प्रणाम, पद्म पुरस्कार घेण्यासाठी पोहोचलेल्या 126 वर्षीय स्वामी शिवानंद यांचा VIDEO व्हायरल

PM मोदींना दंडवत प्रणाम, पद्म पुरस्कार घेण्यासाठी पोहोचलेल्या 126 वर्षीय स्वामी शिवानंद यांचा VIDEO व्हायरल

googlenewsNext

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज पद्म पुरस्कार देऊन लोकांचा सन्मान केला. यावेळी पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Awards) घेण्यासाठी वाराणसीचे 126 वर्षीय स्वामी शिवानंद (Swami Sivananda) अनवाणी पायाने पोहोचले होते. पद्म पुरस्कार घेण्यापूर्वी स्वामी शिवानंद, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर नतमस्तक झाले. पुरस्कार घेण्यापूर्वी स्वामी शिवानंद, हे पीएम मोदींना नमस्कार करण्यासाठी गुडघ्यावर बसले. तेवढ्यात, शिवानंद यांचा हा भाव पाहून मोदींनीही आपल्या खुर्चीवरून उठत शिवानंद यांच्या सन्मानार्थ त्यांना नमस्कार केला.

पंतप्रधान मोदी यांना नमस्कार केल्यानंतर स्वामी शिवानंद हे पद्म पुरस्कार घेण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापुढेही गुडघ्यावर बसले. स्वामी शिवानंद यांना आपल्या समोर झुकलेले पाहून राष्ट्रपती कोविंद हेदेखील समोर आले आणि त्यांनी त्यांना वाकून उठवले. 

स्वामी शिवानंद यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. एका आयएएस अधिकाऱ्याने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, '126 वर्षांचे योग गुरू स्वामी शिवानंद यांना पद्मश्रीने सन्मानित  से सम्मानित करण्याची घोषणा. योगासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे स्वामी शिवानंद आपल्या नम्र व्यक्तिमत्वामुळे सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत. जेथे योगाची उत्पत्ती झाली, आम्ही तेथून आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.

126 वर्षांचे आहेत स्वामी शिवानंद -
स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धती आणि योग क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या 126 व्या वर्षीही स्वामी शिवानंद किशोरवयीन मुलासारखे तंदुरुस्त आणि निरोगी आहेत. स्वामी शिवानंद यांचे जीवन एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. स्वामी शिवानंद यांच्या पासपोर्टनुसार त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 रोजी झाला आहे.

Web Title: Swami Sivananda receives padma shri award for his contribution in the field of yoga PM Narendra Modi president Ramnath kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.