West Bengal: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि लेफ्टने TMC ला साथ दिली: सुवेंदू अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:00 PM2021-05-11T14:00:18+5:302021-05-11T14:01:57+5:30

West Bengal: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि लेफ्टने TMC ला साथ दिली, असे सुवेंदू अधिकारींंनी म्हटले आहे.

suvendu adhikari says congress and left parties helped tmc to defeat bjp in west bengal election | West Bengal: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि लेफ्टने TMC ला साथ दिली: सुवेंदू अधिकारी

West Bengal: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि लेफ्टने TMC ला साथ दिली: सुवेंदू अधिकारी

Next

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ जागांपैकी २९२ जागांवर ८ टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत भाजपला केवळ ७७ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी केवळ तीन जागा जिंकल्या होत्या. यानंतर झालेल्या हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाला. तसेच भाजपच्या काही कार्यालयांनाही लक्ष्य करण्यात आले. या पाश्वभूमीवर भाजपचे नवनियुक्त विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि लेफ्टने TMC ला साथ दिली, असे म्हटले आहे. (suvendu adhikari says congress and left parties helped tmc to defeat bjp in west bengal election) 

एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात सुवेंदू अधिकारी यांनी सदर दावा केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकवण्यासंबंधी निर्देश देण्यात आले होते. तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी डझनभर भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली. हजारो भाजप कार्यकर्त्यांना नाइलाजास्तव आपली घरे सोडावी लागली. तृणमूलच्या समर्थकांनी कोणालाही सोडले नाही, असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या लेखात केला आहे. 

गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच!

भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र

भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, डाव्या आघाडीने तृणमूल काँग्रेसला संपूर्ण सहकार्य केले. मात्र, तरीही तृणमूल काँग्रेसचे गुंड काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या कार्यालयांना लक्ष्य करत आहेत, असा आरोपही अधिकारी यांनी या लेखात केला आहे. भाजपची विचारधारा पटत नसल्यामुळे अनेकांनी बंगाल हिंसाचारावर डोळेझाक केली आहे. तसेच गप्प राहून अप्रत्यक्षपणे हिंसेचे समर्थनही केले जात आहे, असा दावा अधिकारी यांनी केला आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अनेकजण त्याचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडतात. मात्र, भाजपने तसे केले नाही आणि करणारही नाही, असे अधिकारी यांनी नमूद केले. 

“सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?” रवीश कुमारांची PM मोदींवर टीका

सुवेंदू अधिकारींची विरोधी पक्षनेतेपदी निवड

भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला २२ आमदारांनी समर्थन दिले. यानंतर सुवेंदू अधिकारी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपचे केंद्रीय पर्यवेक्षक रविशंकर प्रसाद, महासचिव भूपेंद्र यादव, महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतरही मोदी सरकार झोपा काढत राहिलं”

दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम मतदारसंघातून १,९५६ मतांनी मात दिली. पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांची विरोधी पक्षनेते तर मनोज टिग्गा यांची निवड उपनेता म्हणून करण्यात आली आहे. यापूर्वी सुवेंदू अधिकारी यांच्या व्यतिरिक्त बंगाल भाजपचे प्रदेषाध्यक्ष दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांचीही नावे विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चेत होती. 
 

Web Title: suvendu adhikari says congress and left parties helped tmc to defeat bjp in west bengal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.